महाराष्ट्र मुंबई

मनसेचे संदीप देशपांडे आणि अन्य नेत्यांना जामीन मंजूर

मुंबई | मनसेनं मुंबई आणि उपनगरात सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवासाची मुभा मिळावी यासाठी विनापरवानगी लोकल प्रवास करून सविनय कायदेभंग आंदोलन केलं होतं.

आंदोलनाप्रकरणी मनसे नेते संदीप देशपांडे गजानन काळे, संतोष धुरी आणि अतुल भगत या चौघांना कर्जत रेल्वे पोलिसांनी अटक केली होती. चौघांचीही कल्याण रेल्वे कोर्टाने प्रत्येकी 15 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्‍यावर मुक्तता केली.

चौघांना कल्याण रेल्वे कोर्टात हजर केलं असता सुरुवातीला त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र त्यानंतर मनसेने केलेल्या जामीन अर्जावर सुनावणी दरम्यान कोर्टाने या चौघांचीही प्रत्येकी 15 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्‍यावर मुक्तता केली.

महत्वाच्या बातम्या-

भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा 30 वर

दिलासादायक! राज्यात गेल्या तीन दिवसांपासून नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त

मुंबईतील फॅशन स्ट्रीट आजपासून होणार सुरु

मुंबईत ऑक्सफर्ड लसीच्या चाचण्यांना होणार सुरुवात, केईएमच्या समितीची मिळाली परवानगी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या