निरूपम परप्रांतीय भटका कुत्रा!, मनसेचा निरूपमांच्या घराबाहेर फ्लेक्स

मुंबई | काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांच्या वांद्र्यातील घराबाहेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं भलामोठा फ्लेक्स लावलाय. या फ्लेक्समध्ये निरूपमांचा परप्रांतीय भटका कुत्रा असा उल्लेख केलाय. वाद्र्यांतील काँग्रेसच्या कार्यालयाबाहेरही काही अज्ञातांनी शाईफेक केली.

दरम्यान, काँग्रेस पक्ष कार्यालयाची मनसेनं तोडफोड केली होती.  त्यामुळे भित्रे, नपुंसक, भ्याड अशा शब्दांत निरूपम यांनी मनसे कार्यकर्त्यांवर टीका केली होती.

भाजपनं फूस लावल्यामुळेच मनसेनं राडा घातलाय, असा आरोप काँग्रेस नेत्यांनी केलाय. तोडफोडीनंतर मनसेच्या संदीप देशपांडेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.