बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आम्ही अस्वल… आमच्यावर खूप केस आहेत, दहीहंडी करणारच”

मुंबई | महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात अनेक सांस्कृतिक आणि धार्मिक उत्सव साजरे केले जातात. मात्र, कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून सर्व सण आणि उत्सवांवर सरकारने निर्बँध लावले आहेत. काही दिवसांपूर्वी टास्क फोर्ससोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहीहंडीला परवानगी न देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मनसे आणि भाजप आक्रमक झालेलं पहायला मिळालं. त्यातच आता मनसेने ठाकरे सरकारला थेट इशारा दिला आहे.

मुंबई महापालिकेनं गणेशोत्सव साजरी करण्यासाठी नियमाववली जाहीर केली आहे. मनसे महापालिकेच्या निर्णयाचा विरोध केला आहे. जनआशीर्वाद यात्रा आणि आंदोलनाच्या वेळी कोरोना नसतो का?, असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. आम्ही अस्वल आहोत, आमच्यावर खूप केस आहेत, असा टोलाही संदीप देशपांडे यांनी लगावला आहे.

आम्ही दडीहंडी साजरी करणारच, असा थेट इशारी देखील मनसेने दिला आहे. हिंदू आणि मराठी सणांवरच बंदी का? कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचा काय पुरावा तुमच्याकडे आहे? तुम्हाला वाटलं म्हणून तिसरी लाट येणार आहे का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, ज्या गोविंदांनी कोरोनाचे दोन डोस घेतले आहेत, त्यांना दडीहंडी साजरी करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे. राज्य सरकारने दडीहंडी साजरी करण्यास परवानगी दिली नाही तर आंदोलन करू, अशा इशारा आशिष शेलार यांनी दिला होता. त्यानंतर आता मनसे आणि भाजप हे दोन्ही पक्ष आक्रमक झालेलं पहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या-

“शिवसेना-भाजपच्या भांडणात…”; प्रताप सरनाईक यांचं पुन्हा एकदा मोठं वक्तव्य

“मगरी असलेल्या विहिरीत टांगलं…” पुण्यातील गायकवाड बाप-लेकाचा आणखी एक प्रताप

मोठी बातमी- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड खलबतं

“वरुण सरदेसाई… आता आलास तर तू परत जाणार नाहीस”

वादानंतर पहिल्याच भाषणात राणेंचा उडवून दिली खळबळ, “आपल्याच बंधूच्या पत्नीवर…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More