बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मनसेने कधीही सत्तेसाठी शिवसेनेसारखी लाचारी पत्करली नाही”

मुंबई | आगामी काळात राज्यातील महानगरपालिका निवडणुका होणार आहेत. राज्यातील येऊ घातलेल्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी आपापली तयारी चालू केली आहे. राज्यातील महत्त्वाची महानगरपालिका म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला ओळखलं जातं. अशातच मनसेचे आमदार राजू पाटील यांनी शिवसेना आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे.

गेली अनेक वर्ष झालं शिवसेनेकडून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भावनिक खेळ सुरू आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूकीवर राजू पाटील यांनी आपली स्पष्ट मतं मांडली आहेत. शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात असल्याचं दाखवतात पण आमचा त्यांच्यावर विश्वास राहिला नाही, असंही राजू पाटील यांनी म्हंटलं आहे. मनसेने कधीही सत्तेसाठी शिवसेनेसारखी लाचारी पत्करली नाही, अशी जहरी टीका राजू पाटील यांनी केली आहे.

आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांचे विचार राज ठाकरे यांच्याकडून मिळाले आहेत, असं राजू पाटील यांनी म्हटलं आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या वादावर ते म्हणाले की, ते कधीही एकमेकांना डोळा मारू शकतात. या दोन्ही पक्षांवर आमचा विश्वास नाही, या शब्दात राजू पाटील यांनी शिवसेना आणि भाजपवर टीका केली आहे.

आगामी काळात मनसे कल्याण डोंबिवलीच्या विकासासाठी महानगरपालिका निवडणूकीत ताकदीने उतरणार असल्यांचही आमदार राजू पाटील म्हणाले आहेत. राजू पाटील यांनी कल्याण डोंबीवलीतील विविध विकास कामांबद्दल यावेळी माहिती दिली आहे.

थोडक्यात बातम्या 

एकरकमी FRP साठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे डिजिटल आंदोलन

“महाराष्ट्रात काॅंग्रेसला पुन्हा एक नंबरचा पक्ष बनवणार”

शेतकऱ्यांना आता 6000 ऐवजी मिळवता येणार पूर्ण 36 हजार रुपये, वाचा सविस्तर

“महिलांवर अत्याचार व्हावेत असं रावणालाही वाटत नसेल”

…म्हणून नरेंद्र मोदी ‘कोव्हॅक्सिन’ घेऊनही अमेरिकेत गेले, वाचा कारण!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More