महाराष्ट्र मुंबई

‘काही लोकांना राजद्वेषाचा मूळव्याध’; संदिप देशपांडेंचं राऊतांना प्रत्युत्तर

मुंबई | शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखावर मनसेने पलटवार केला आहे. काही लोकांना राजद्वेषाचा मूळव्याध झाल्याची जहरी टीका मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली आहे.

सामनाच्या अग्रलेखात राज ठाकरेंच्या महसूल वाढवण्यासाठी दारुविक्री सुरु करण्याच्या सूचनेवर अनेक उपरोधात्मक टोले लगावले होते. यालाच मनसेने प्रत्युत्तर दिलं आहे.

अख्खा महाराष्ट्र सध्या कोरोनाशी लढतो आहे. यात सर्वच लोक महाराष्ट्र सरकारला सहकार्य करत आहेत. राज ठाकरेदेखील वेळोवेळी राज्य सरकारला योग्य त्या सूचना देत होते. राज्य सरकारनेही बऱ्याचदा त्याची दखल घेतली आहे, असं संदिप देशपांडे यांनी म्हटलंय.

राज ठाकरे यांनी महसुलाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठकारे यांना एक पत्र पाठवलं होतं. यावर सामनावीर संजय राऊत यांनी एक अग्रलेख लिहिला, असं म्हणत संदिप देशपांडे यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

गृहमंत्री अनिल देशमुखांनी आजीबाईंना स्वत: घातला मास्क

लॉकडाऊनमध्ये दारूची दुकाने बंदच राहणार; केंद्रीय गृहमंत्रालयाचं स्पष्टीकरण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या