बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मनसेकडून शिवरायांच्या राजमुद्रेचा अवमान’; शिवसेनेसह इतर संघटनांचा आरोप

मुंबई | मनसेने आंदोलनादरम्यान राजमुद्रा असलेल्या आपल्या पक्षाचा झेंडा वापरून छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमुद्रेचा अपमान केला आहे, असा आरोप शिवसेना, अर्जुन प्रतिष्ठान आणि भारतीय मराठा महासंघाने केला आहे.

ठाण्यातील गोकुळनगर येथील नाले सफाईकडे पालिका दुर्लक्ष करत असल्याचं सांगत शहर अध्यक्ष रविंद्र मोरे यांनी त्या नाल्यात उतरून आंदोलन केलं. यावेळी एक कार्यकर्ता तो झेंडा हातात घेऊन नाल्यात थांबलेला फोटोत दिसतोय. यावर शिवसेना, अर्जुन प्रतिष्ठान तसेच भारतीय मराठा महासंघाने आक्षेप घेतला आहे.

शहरअध्यक्ष रविंद्र मोरे यांनी हे आंदोलन केल्याने त्यांची पक्षाने हकालपट्टी करावी, अशी मागणी शिवसेना, अर्जुन प्रतिष्ठान आणि भारतीय मराठा महासंघाने केली आहे.

दरम्यान, मी स्वात: झेंडा हातात घेतला नव्हता. ते कार्यकर्तांनी आणला होता. तसेच तो नाल्यात नाही हातात धरला होता. त्यामुळे आम्ही शिवाजी महाराजांचा अपमान केलेला नाही, असं रविंद्र मोरे यांनी सांगितलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

‘या’ तीन प्रकारे पसरतोय कोरोनाचा विषाणू, जाणून घ्या काय आहेत लक्षणं

पुण्यात आज 207 रूग्णांना डिस्चार्ज, पाहा किती रूग्ण वाढले…

महत्वाच्या बातम्या-

राज्यात आज 3607 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद, जाणून घ्या सर्व आकडेवारी…

परीक्षा रद्द करा किंवा तयारीसाठी पुरेसा वेळ तरी द्या; पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या डॉक्टरांची मागणी

तुकोबा आणि माऊलींच्या पालख्या सज्ज; ‘इतक्या’ वारकऱ्यांसह प्रस्थानास परवानगी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More