मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच राज ठाकरेंनी ठाण्यातील सभेत राज्य सरकारला 3 मे पर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेला विरोधकांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. त्यातच आता राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे.
मनसे हा संपलेला पक्ष आहे. राज ठाकरे हे स्वत: बाळासाहेब ठाकरे बनायला पाहत आहेत. त्यांचे राहणीमान, कपडे यावरून हे दिसून येत आहे, असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे. तसेच राज ठाकरे यांनी एक कहाणी रचली असून त्यावरून वाद सुरू आहे, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या आहेत.
या बिनडोकगिरीकडे लक्ष न देता आपण संविधान वाचलं पाहिजे, असंही यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे. यशोमती ठाकूर यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेवरून शाब्दिक हल्ला चढवला आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत 5 जून रोजी अयोध्येला जाणार असल्याचं म्हटलं आहे. तसेच 1 मे महाराष्ट्र दिनी औरंगाबादला सभा घेणार असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं आहे. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे मशिदीवरील भोंग्याविरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत.
थोडक्यात बातम्या-
“…तर आम्ही इथवर पोहोचलोच नसतो”; ज्येष्ठ दिग्दर्शकाची भावूक पोस्ट
देशाच्या राजकारणात खळबळ! शरद पवारांच्या पुढाकाराने मुंबईत मोठी बैठक होणार
“हनुमान चालिसाच्या दोन ओळी म्हणता येत नाहीत अन्…”
“गुणरत्न सदावर्ते यांची जीभ कापून आणणाऱ्याला ‘इतक्या’ लाखांचं बक्षिस”
Raj Thackeray | ‘3 तारखेनंतर भोंगे हटवले नाहीत तर…’; राज ठाकरेंचा इशारा
Comments are closed.