“तुला तुडवणारच, कुत्र्यासारखं मारणार”; मनसे नेत्याने काढली अमोल मिटकरींची लायकी

MNS Karnabala Dunbale | अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांच्या गाडीवर अकोला येथे हल्ला करण्यात आला. त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका करत त्यांना ‘सुपारीबाज’ असं म्हटलं होतं. मिटकरी (Amol Mitkari ) यांच्या या टिकेनंतर त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. मनसे कार्यकर्त्यांकडून त्यांची गाडी फोडण्यात आल्याचा दावा मिटकरी यांनी केला आहे.या घटनेनंतर एका मनसे कार्यकर्त्याचा ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाय. आता यावरुन राजकारण सुरु झालं आहे. अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्या बद्दल सुपारीबाज हा शब्द वापरला, त्यानंतर मनसे कार्यकर्ते प्रचंड संतापले आहेत. (MNS Karnabala Dunbale)

दुसरीकडे अमोल मिटकरी यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी गाडीवर हल्ला करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार असल्याचं म्हटलंय. “भ्याड हल्ले करून पुरुषार्थ गाजवला असे समजत असाल तर तो तुमचा भ्रम आहे. अजितदादांवर तुमच्या नेत्याने तोंडसुख घेतल त्याची एक छोटी प्रतिक्रिया केवळ शब्दात मांडली. तुमच्यात मर्दुमकी नव्हती हे दाखवून सुपारीबहाद्दर असल्याचे आज अधोरेखित झाले.”, असं मिटकरी म्हणाले आहेत. यानंतर हा वाद अजूनच चिघळला आहे.

“अजित पवारांनी तुम्हाला हात दिला नसता तर..”

आज मनसेच्या एका नेत्याने अमोल मिटकरी यांची थेट लायकीच काढली आहे. तसेच त्यांना तुडवणारच, कुत्र्यासारखं मारणार अशी धमकी देखील दिली आहे. मनसे सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे (MNS Karnabala Dunbale) यांनी अमोल मिटकरींना ही उघड धमकी दिली आहे. यामुळे वातावरण अजूनच तापलं आहे.

“आम्ही पोलीस आणि संविधानाला मानणारी लोक आहेत. अजित पवारांनी जर तुम्हाला हात दिला नसता तर तुमची लायकी काय होती, हे अमोल मिटकरी यांनी लक्षात ठेवावं. त्यानंतर आपण कोणाबद्दल बोलतो याचा विचार करावा. हे योग्य नाही”, असे कर्णबाळा दुनबळे म्हणाले आहेत.

“..मग टॉयलेटमध्ये जाऊन का लपला होतास?”

“जर आम्ही नामर्दाची औलाद असतो, तर तू काल टॉयलेटमध्ये जाऊन का लपला होतास? मी जर तिथे असतो तर तुला तुझी औकात दाखवली असती. तुझ्या राष्ट्रवादीच्या लोकांना मी कोण आहे हे विचार”, असंही कर्णबाळा दुनबळे म्हणाले आहेत. पुढे त्यांनी अत्यंत संतप्त होऊन मिटकरी यांना धमकीच देऊन टाकली.

“मी तुला बोललो आहे तुला तुडवणार म्हणजे तुडवणारच. तुला कुत्र्यासारखा मारणार. हरामखोरासारखा बोलू नको. मर्यादा ठेव. मर्यादा पाळ. भाषेची मर्यादा सर्वांनी पाळावी. आम्ही कोणाच्या आई, बहीण किंवा वडीलधाऱ्यांबद्दल आम्ही बोलत नाही. ती आमची संस्कृती नाही. राज ठाकरेंनी आम्हाला ते शिकवलं नाही आणि पळून जाणं आमच्या रक्तात नाही.”, असं कर्णबाळा दुनबळे (MNS Karnabala Dunbale) यांनी म्हटलं आहे.

News Title –  MNS Karnabala Dunbale warns Amol Mitkari

महत्त्वाच्या बातम्या-

“राहुल गांधी ड्रग्ज घेतात, त्यांची चाचणी…”; कंगना रनौतचं मोठं वक्तव्य

“आपल्या देशात सेक्सला खूपच कमी महत्व दिलं जातं”; सई ताम्हणकरचं वक्तव्य चर्चेत

गुड न्यूज! सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, जाणून घ्या दर

“प्रचंड असह्य वेदना..”; किरण माने आयसीयूमध्ये दाखल

पवित्र श्रावणात ‘या’ ज्योतिर्लिंगांचं घ्या दर्शन; IRCTC चे टूर पॅकेज एकदा बघाच