मुंबई | मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांच्याविरोधात मनसे कार्यकर्त्यांनी निदर्शनं करण्यास सुरूवात केलीय. पनवेलमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी संजय निरूपम यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला.
भित्र्या, भ्याड मनसे कार्यकर्त्यांनी कोणी नसताना बघून काँग्रेस प्रदेश कार्यालयावर हल्ला केला, असं निरूपम मनसे कार्यकर्त्यांबद्दल बोलले होते. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांना त्यांच्याविरोधात निदर्शनास सुरूवत केलीय.
दरम्यान, मनसे कार्यकर्त्यांनी फेरीवाला आंदोलनावरून मुंबईतील आझाद मैदानाजवळील काँग्रेस प्रदेश कार्यालयाची तोडफोड करून साहित्यांचं नुकसान केलं होतं. त्यामुळे निरूपम यांनी मनसे कार्यकर्त्यांवर टीका केली होती.
Comments are closed.