‘आणि… घाणेकर’साठी मनसे आक्रमक; खळ्ळ खटॅकचा इशारा

‘आणि… घाणेकर’साठी मनसे आक्रमक; खळ्ळ खटॅकचा इशारा

कल्याण | कल्याणमध्ये मनसे पुन्हा एकदा चित्रपटगृहांविरोधात आक्रमक झाली आहे. ‘आणि… डॉ काशिनाथ घाणेकर’ सिनेमाला प्राईम टाईमचा शो न दिल्यास मनसेने खळ्ळ खटॅकचा इशारा दिला आहे.

अभिनेते डॉ काशिनाथ घाणेकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपट पाडव्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची टक्कर हिंदी चित्रपट ‘ठग्ज ऑफ हिंदुस्तान’सोबत आहे. 

‘ठग्ज ऑफ हिंदुस्तान’चे दिवसातून आठ शो होतात तर ‘आणि… डॉ काशिनाथ घाणेकर’चा फक्त एकच शो दिला जात आहे.

मनसेने कल्याणमधील ‘सिनेमॅक्स’ चित्रपटगृहाला याप्रकरणी इशारा दिला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-पुतळ्याचे लॉलीपॉप दाखवणाऱ्यांपासून हिंदूंनी सावध राहावे- उद्धव ठाकरे

-अवनी प्रकरणी नितीन गडकरींची सुधीर मुनगंटीवारांना क्लीन चीट

-युतीसाठी शिवसेनेला हात जोडून विनंती करत आहे- चंद्रकांत पाटील

-बाळा… त्यांना खायला घालू नकोस, अरे ते आपल्या मुंबईचे महापौर आहेत!

-मेनका गांधींच्या भावना मी समजू शकतो- मुख्यमंत्री

 

Google+ Linkedin