बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘तुला थोबडवनार लवकरच, मुंबईत राहून कसं करिअर बनवतो तेच बघतो’; खोपकरांचा बिग बॉसमधील स्पर्धकाला इशारा

मुंबई | बिग बॉसच्या 14 व्या पर्वाला सुरूवात झाली आहे. यामध्ये स्पर्धकांमध्ये काहीना काही वाद चालूच असतात. मात्र जान कुमार सानूने मराठी गायक राहुल वैद्यला बोलताना मराठी भाषेबाबत अपशब्द उच्चारल्याने मनसे नेते अमेय खोपकर आक्रमक झाले असून त्यांनी जान कुमार सोनूला धमकीवजा इशारा दिला आहे.

मुंबईत राहून तर आता तुझं करिअर कसं बनतं जान सानू तेच बघतो आता मी. लवकरच तुला स्वत:ची चीड येईल ही माझी गॅरंटी. तुला थोबडवनार लवकरच आता आम्ही मराठी, असं खोपकरांनी म्हटलं आहे.

कलर्ससारख्या वाहिनीने खरंतर हा सीन वगळायला हवा होता पण एडिट केलं नाही ते बरं झालं, गद्दारांची तोंडं कशी असतात ते समजलं असल्याचं खोपकर म्हणाले.

दरम्यान, जान कुमार सानू… मराठी भाषेची याला चीड येते म्हणे. अरे तू कीड आहेस मोठी. मुंबईतून हाकलून देण्यासाठी मी नाॅमिनेट करतोय याला, असंही खोपकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

 

 

महत्वाच्या बातम्या-

लवकरच मुंबईकरांसाठी लोकल सेवा होणार सुरु; ठाकरे सरकारने दिले संकेत

‘शरद पवारांनी तो प्रश्न केला आणि….’, तिकीट नाकारण्यासंदर्भात सुजय विखेंचा मोठा गौप्यस्फोट

नितीश कुमार भाजपाला धोका देतील; चिराग पासवान यांची टीका

‘बाबा मला नेहमी म्हणायचे की…’, वडिलांच्या आठवणीत मनदीप सिंग भावूक

…तर राज्य सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही- उदयनराजे भोसले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More