बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मनसेच्या ‘या’ बड्या नेत्याला पोलिसांनी केली अटक

ठाणे | आंदोलन आणि आपल्या आक्रमक भुमिकेमुळे कायमच चर्चेत असणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना पोलिसांनी आज अटक केली आहे. जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव हे आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसोबत मलंगगडावर आरती करण्यासाठी जाणार होते, मलंगगडावर निघाले असताना काकडवाल गावाजवळ पोलिसांनी  त्यांना अडवुन अविनाश जाधव आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन नेवाळी पोलिस चौकीत आणलं त्यानंतर त्यांना उल्हासनगर पोलिसांनी अटक करून ताब्यात घेतलं.

कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोेलिसांनी अविनाश जाधव यांच्यावर ही कारवाई केल्याचं समजतंय. आज अविनाश जाधव हे मलंगगडावर आरती करण्यासाठी जाणार हे कळल्यानंतर पोलिसांनी तात्काळ पावलं उचलत ही कारवाई केली.

नेवाळी पोलिस चौकीत अंबरनाथच्या सहाय्यक पोेलिस आयुक्तांनी अविनाश जाधव यांच्याशी चर्चा करूनही तोडगा न निघाल्याने त्यांना अटक केल्याचं सांगण्यात येत आहे. संबंधित कारवाईमुळे मनसे कार्यकर्त्यांमधुन नाराजीचा सुर उमटत असल्याचं दिसुन येत आहे. तसेच आता पुढे या प्रकरणात आता काय होणार हे पाहणं तितकचं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या

मुंबईतील ‘ही’ पाच ठिकाणं अत्यंत धोक्याची, काम नसेल तर जाणं टाळा!

फेसबुकला मोठा फटका, कंपनीची ‘ही’ सेवा ठप्प झाल्याने यूझर्सचीही मोठी नाराजी

संकष्टी चतुर्थीला पुण्यातील दगडूशेठ मंदिर बंद, प्रशासनानं केलं ‘हे’ महत्त्वाचं आवाहन

बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकावरून नव्या वादाला सुरूवात

महाराष्ट्रातील ‘या’ 8 जिल्ह्यांमध्ये आहेत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More