बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मनसेचा नेता फडणवीसांच्या दारी?; सांगितलं… नेमकं काय घडलं भेटीत!

मुंबई | राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका अलिकडेच पार पडल्या. पालघर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजप आणि मनसेने युती झाली होती. परंतु आगामी महापालिकेसाठी भाजप मनसे युती होणार का?, याकडे सगळ्याचं लक्ष लागलेलं आहे. अशातच आता मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीवरून राज्यात युतीसंदर्भात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत, त्यावर बाळा नांदगावकर यांनी या भेटीबद्दलचं मौन सोडलं आहे.

देवेेंद्र फडणवीस यांच्याकडे माझं काहीही काम नव्हतं. फडणवीस यांची मी फक्त वैयक्तिक कारणासाठी भेट घेतली आहे. ज्यावेळी दोन राजकीय नेते भेटतात, तेव्हा राजकीय चर्चा या होतच असतात. आमच्या भेटीचा जो अर्थ तुम्हाला काढायचा आहे, तो काढा. मी फक्त वैयक्तिक कारणासाठी भेट घेतली आहे, असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे. तसेच यांनी यावेळी ड्रग्ज प्रकरणाबाबतही प्रतिक्रिया दिली आहे.

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना मी दीर्घकाळापासून ओळखत आहे. ते कोणत्याही प्रश्नांना उत्तर देण्यासाठी सक्षम आहेत. तसेच ते एक शासकीय अधिकारी असून त्यांची जबाबदारी ते चोखपणे बजावत असतील, याची मला खात्री आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे 25 टक्के उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे आगामी महापालिकेसाठी भाजप मनसेसोबत युती करणार का? हे आता पाहावं लागणार आहे. दरम्यान, मनसेचा मेळावा भांडुपमध्ये आयोजित केला असून त्यावेळी पदाधिकारी आणि शाखाध्यक्ष उपस्थित राहतील, असंही नांदगावकर म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

“तुम्ही ज्या मुख्यमंत्र्याची जात काढली, त्याच मुख्यमंत्र्याने मराठा आरक्षण दिलं”

नात्याला काळिमा फासणारी घटना, सख्ख्या दिराकडून वहिनीवर वारंवार बलात्कार

“बहुजन आधीच उपाशी, त्यात…”; मेळाव्यात बोलताना पंकजा मुंडे संतापल्या

‘…त्याआधीच अजित पवारांनी आरक्षण रद्द केलं’; गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप

“शिवसेना निवडणुकीसाठी अशा पद्धतीनं पैसा गोळा करते”; मनसेचा खळबळजनक आरोप

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More