‘आता लाडक्या नातवाचं बघा’; मनसे नेत्याने मुख्यमंत्र्यांना सुनावलं

MNS Leader Gajanan Kale | राज्याचा अर्थसंकल्प नुकताच जाहीर झाला. या अर्थसंकल्पात राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी लाडकी बहीण योजनेची घोषणी केली आहे. त्यानंतर आता सरकारने लाडका भाऊ योजना देखील सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. या योजनेसंदर्भात तरूणांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

लाडका भाऊ योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. असं असताना मनसे नेते गजानन काळे यांनी सरकारवर टीका केली आहे. राज्यामध्ये आता लाडक्या नातवाचं देखील काहीतरी बघा, असा टोला मनसे नेत्याने लगावला आहे. (MNS Leader Gajanan Kale)

खासगी शाळेत मुलांना अद्यापही प्रवेश नाही

लाडकी भाऊ, लाडका भाऊ यांच्यानंतर लाडक्या नातवाचे देखील बघा. वंचित, गरीबांच्या मुलांना RTE मधून खासगी शाळेत मोफत शिक्षणाचा हक्कच यावेळी राज्यसरकारने काढून घेतला. यामुळे हजारो मुलांना शाळेत अद्यापही प्रवेश मिळू शकला नाही. RTE मध्ये राज्यभरात 9331 शाळा असून 1 लाख 15 हजाराच्या वर जागा आहे.

उच्च सरकारविरोधात जनहित याचिका आहे. यामुळे राज्य सरकारने पूर्ण प्रक्रिया करून घेऊनही अद्यापही खासगी शाळेत मुलांना प्रवेश दिला नाही, असं मनसे नेते गजानन काळे म्हणाले. (MNS Leader Gajanan Kale)

“सरकाने लाडक्या नातवासाठी पैसे भरावेत”

लाडका भाऊ, लाडकी बहिणीसाठी आता सरकाने लाडक्या नातवासाठी पैसे भरावेत. शाळा प्रवेशांच्या असलेल्या गोरगरीब मुलांचा प्रवेश करून त्यांचे शैक्षणिक नुकसान वाचवावे आणि पालकांना दिलासा द्या, अशी मागणी आता गजानन काळे (MNS Leader Gajanan Kale) यांनी केली आहे.

अशातच लाडका भाऊ योजनेवरून राज्यातील विरोधक नेत्यांनी सरकारला धारेवर धरलं आहे. राज्यात 3 डिसेंबर 1974 सालापासून ‘रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम’ नावाची एक योजना राबवली जाते. या योजनेत बदल करून सरकारने ही योजना आणली आहे. (MNS Leader Gajanan Kale)

News Title – MNS Leader Gajanan Kale Slam To State Government On Ladka Bhau Yojana And RTE Education

महत्त्वाच्या बातम्या

“किती प्रॉपर्टी घेऊन चाललीस?”; हार्दिकपासून विभक्त होताच नताशा नेटकऱ्यांकडून ट्रोल

हायकोर्टाचा राज्य सरकारला मोठा दणका; RTE प्रवेशाबाबतचा ‘तो’ अध्यादेश रद्द

लाडकी बहिण योजनेच्या नावाखाली लाडक्या भावाचा छुपा प्रचार!

‘या’ भागात पावसाचा हाहाकार; शाळेतील 120 विद्यार्थी पुराच्या पाण्यात अडकली

सर्वसामान्यांना दणका! टोमॅटोचे दर गगनाला भिडले, एक किलोचा भाव तब्बल ‘इतके’ रुपये