Top News

खळबळजनक! मनसे नेत्याची तलवारीने वार करून हत्या

ठाणे | मनसे अंबरनाथ उपशहर अध्यक्ष राकेश पाटील यांची तलवारीने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जागेच्या वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.

अंबरनाथमध्ये शिवमंदिर मार्गावर रिलायन्स रेसिडेन्सी भागातील पटेल आर मार्टजवळ बुधवारी रात्री मनसे उपशहर अध्यक्ष राकेश पाटील यांच्यावर चार हल्लेखोरांनी तलवारी वार केल्याची घटना घडली.

राकेश पाटील पटेल आर मार्टजवळ उभे होते. त्याचवेळी चार अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना खाली पाडत त्यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले.

 महत्वाच्या बातम्या-

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज राज्यपालांना भेटणार!

“शुगर वाढली की राणे काय बोलतात, ते त्यांनाच कळत नाही”

मराठी भाषिकांची मनापासून माफी मागतो, अशी चूक पुन्हा होणार नाही- जान कुमार

शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन भाजपचा उद्धव ठाकरेंना टोला, म्हणाले…

‘…तोपर्यंत आम्ही एकत्र’; ‘या’ काँग्रेस नेत्याचं मोठं वक्तव्य

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या