‘ट्रेलर नाही मी डायरेक्ट पिक्चर दाखवणार’; राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य

मुंबई | मराठी राजभाषा गौरव दिन महाराष्ट्रात (Marathi Bhasha Din) मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवसाचं महत्व म्हणजे ज्येष्ठ कवी विषणू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज (Marathi Poet Kusumagraj) यांच्या जन्मदिवसानिमीत्त मराठी राजभाषा दिन साजरा करतात. या दिवशी अनेक ठिकणी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केलं जातं.

पनवेेलमध्ये मनसेच्या वतीने मराठी राजभाषा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या वेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं.

मराठी भाषा या व्यतिरिक्त त्यांना राजकारणाशी संबधी प्रश्न विचारण्यात आले. सध्या सुरु असलेल्या राजकारणा विषयी तुम्हाला काय वाटतं असा प्रश्न त्यांना विचारला. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता अनेक प्रश्न निर्माण होतात मात्र, याचं उत्तर तुम्हाला आता नाही तर गुढीपाढव्याच्या सभेला मिळेल, असं ठाकरे म्हणालेत.

त्यानंतर त्यांना मराठी भाषा विषयी प्रश्न विचारण्यात आले. भाषण करुन आल्यावर काय बोललो, यापेक्षा काय दिलं हे बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवलं, असं देखील राज ठाकरे म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

उद्धव ठाकरेंना पुन्हा झटका?; सर्वात जवळची व्यक्ती शिंदेंच्या संपर्कात?

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याचं जेवणाचं बील 2 कोटी 38 लाख रुपये, अजित पवार म्हणाले…

हेमंत रासने आणि रविंद्र धंगेकर दोघांच्या अडचणी वाढल्या!

मनसेला मोठा धक्का; ‘या’ नेत्याने दिला राजीनामा

वजन कमी करण्यासाठी नाष्ट्यामध्ये खा ‘हा पदार्थ आहार