बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संदीप देशपांडेंच्या अडचणीत वाढ! अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात धाव

मुंबई | सर्वत्र सध्या हनुमान चालीसा आणि भोंग्यांचा मुद्दा चर्चेत आहे. अशातच मनसे नेते संदीप देशपांडेंच्या अडचणीत आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. देशपांडेंवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी पळ काढताना महिला पोलीस कर्मचाऱ्याला धक्का दिल्यानं सर्वत्र वाद उद्भवला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आता देशपांडे आणि धुरी यांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे.

गुन्हा दाखल झाल्यापासून धुरी आणि देशपांडे फरार आहेत. परिणामी शिवसेना आणि मनसेदरम्यान वाद देखील वाढले आहेत. अशात आता न्यायालयात अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मनसे प्रमुख राज ठाकरेंना अयोध्या दौरा जवळ आला असताना आता हे प्रकरण वाढत असल्यानं तणाव वाढला आहे. तिकडं उत्तर प्रदेशात काही भाजप नेत्यांनी राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध केला आहे.

थोडक्यात बातम्या – 

श्रीलंकेत पुन्हा आणीबाणी! महिंदा राजपक्षेंचा राजीनामा

सत्र न्यायलयाचा राणा दांपत्याला दणका; अटींचं उल्लंघन अंगलट येणार?

संजय राऊतांच्या अडचणी वाढणार? किरीट सोमय्यांनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल

…अन् संजय राऊत आणि अजित पवार आपापसातच भिडले

काय सांगता? सोनाक्षी सिन्हाने गुपचूप साखरपुडा उरकला? ‘त्या’ फोटोंमुळे चर्चांना उधाण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More