बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“उद्यापासून ‘घट’ बसतील, पण घरातच ‘घट्ट’ बसून राहिलेले मुख्यमंत्री कधी उठतील?”

मुंबई | गणपती उत्सव संपला की लोकांना नवरात्रीचे वेध लागतं. यावेळी जागोजोगी देवीच्या स्थापनेसाठी मंडप उभारले जातात. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते. याच विषयाला धरून  मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

उद्यापासून घट बसतील परंतु गेली दीड वर्ष घरातच घट्ट बसून राहिलेले मुख्यमंत्री कधी उठतील?, असं शालिनी ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच राज्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले असून सरकारकडून कोणतीही कारवाई केली जात नाही, अशीही टीका शालिनी ठाकरे यांनी राज्य सरकारवर केली आहे.

मुसळधार पावसाने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. परंतु अजुनही ओला दुष्काळ फंड जाहीर झाला नाही. अशावेळी सरकार काय करत आहे? राज्यात खड्डेमय रस्ते झाले असून त्यातून मार्ग काढताना नाकी नऊ येत आहे, असंही शालिनी ठाकरे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, या वर्षी तृतिया आणि चतुर्थी या दोन्ही तिथी एकाच वेळी आल्यामुळे नवरात्र उत्सव 8 दिवसांचा असणार आहे. यंदा विजयादशमी म्हणजे दसरा 15 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘शेतकऱ्यांना चिरडणारी थार कार आमचीच…’; केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांची कबुली

…आणि म्हणून काँग्रेस उद्यापासून ‘जेलभरो’ आंदोलन करणार

पोलिसांनी भाजपच्या माजी महिला खासदाराला केस ओढत धक्के देत गाडीत ढकललं, पाहा व्हिडीओ

मोठी बातमी! एकनाथ खडसे पुन्हा एकदा बाॅम्बे रुग्णालयात दाखल

शिवसेना खासदार पुत्राचा पालघरमध्ये पराभव

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More