नांदेड महाराष्ट्र राजकारण

“पैसा अन् जात या दोन गोष्टींवरच राजकारण…” मनसे शहराध्यक्षांची मन सुन्न करणारी सुसाईड नोट

नांदेड | “राज साहेब अखेरचा जय महाराष्ट्र. मला माफ करा. पैसा आणि जात या दोनच गोष्टींवर राजकारण चालतं, या दोन्ही गोष्टी माझ्याकडे नाहीयेत” नांदेड जिल्ह्यातील मनसेचे किनवट शहराध्यक्ष सुनिल ईरावार यांनी आत्महत्या करताना लिहीलेल्या या सुसाईड नोटनं आता सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

राजकारण करण्याऐवढी माझी आर्थिक परिस्थिती राहिलेली नाही. म्हणून यापुढचं जीवन मी माझ्या मनानं संपविण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या आत्महत्येमुळे कुणालाही त्रास देऊ नका. पप्पा, काका, काकू, मोठी वहिनी आणि पप्पू दादा मला नक्की माहित आहे, की मी माफ करण्याच्या लायक नाही. मात्र तरी तुम्ही मला माफ कराल, असं भावुक आवाहनही सुनिल यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये केलं आहे.

रविवारी सकाळच्या सुमारास सुनिल यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मनसेचे प्रामाणिक कार्यकर्ते म्हणून सुनिल यांची पंचक्रोशीत ओळख होती. मात्र कुटूंब चालवताना आलेल्या आर्थिक अडचणींमुळे त्यांनी आत्महत्या करण्यासारखं टोकाचं पाऊल उचलल्यानं आता बोललं जात आहे.

सुनिल यांच्या आत्महत्येनं राजकारणातील सामान्य कार्यकर्त्याची होणारी होरपळ पुन्हा एकदा समोर आली आहे. मात्र एक प्रामाणिक आणि सच्चा कार्यकर्ता गमावल्यानं शहरातील मनसे कार्यकर्त्यांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

आर.आर. आबांचं जनतेच्या मनातलं स्थान अढळ, अजितदादांकडून आठवणींना उजाळा

धोनी आणि रैनाच्या एकाच दिवशी निवृत्ती घेण्यामागे आहे ‘हे’ खास कारण…

“धोनी एक चांगला लीडर, त्यानं 2024 ची लोकसभा निवडणूक लढवावी”

पार्थ प्रकरणावर अजित पवार पहिल्यांदाच बोलले, म्हणाले….

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या