मुंबई | शिवसेना पक्षाने राष्ट्रपतींच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) उमेदवार दौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना पाठींबा जाहीर केला. यापू्र्वी राष्ट्रपती पदाचे उमेदवार मुंबई दौऱ्यावर आले की ते मातोश्रीला भेट दिल्याशिवाय परत जात नव्हते. तसा एक राजकीय पायंडाच पडला होता. दोन दिवसांपूर्वी मुर्मू मुंबई दौऱ्यावर आल्या होत्या परंतु त्यांनी मातोश्रीला भेट दिली नाही. यावर आता मनसेने आपला निशाणा साधून घेतला.
मनसेचे यशवंत किल्लेदार (Yashwant Killedar) यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) खोचक टीका केली आहे. “मातोश्रीचे आता पूर्वीचे वजन संपले आहे आणि याला सर्वस्वी उद्धव ठाकरे जबाबदार आहेत” असे किल्लेदार म्हणाले. राष्ट्रपती पदाचे उमेदवार मुंबईत आले की, मातोश्रीवर पाठींब्यासाठी जरुर जातात पण, आताचे उमेदवार दौपदी मुर्मू यांनी मातोश्रीकडे पाठ फिरवली.
शिवसेनेने यापु्र्वी देखील राष्ट्रपतींच्या निवडणुकीत प्रतिभा पाटील (Pratibha Patil), प्रणव मुखर्जी (Pranav Mukharji) यांना पाठींबा दिला होता. यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी (Bal Thackeray) आपली पक्षीय विचारसरणी आणि मते बाजूला ठेवत काँग्रेसच्या प्रतिभा पाटील यांना पाठींबा दिला होता. विशेष म्हणजे मुखर्जी जेव्हा राष्ट्रपतीपदाचे उमेदवार होते आणि त्यांनी मुंबई दौरा केला होता, तेव्हा ते मातोश्रीवर ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले होते. ही परंपरा मुर्मू यांनी मोडली.
यशवंत किल्लेदार यांनी यावेळी माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर (Aditya Thackeray) देखील टीका केली. दादर येथील शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदानावर रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प उभारण्यात आला होता. काल झालेल्या मुसळधार पावसाने शिवाजी पार्कवर पाणीच पाणी झाले होते. त्यामुळे हा प्रकल्प कुचकामी ठरला असे म्हणत किल्लेदारांनी ठाकरेंनी या प्रकल्पाचा खर्च 4 कोटी दाखवून 2 कोटी गडप केले असा आरोप केला.
थोडक्यात बातम्या –
‘एकनाथ शिंदेंनी तुम्हाला राजकीय कुबड्या दिल्या’, निलेश राणे दीपक केसरकरांवर बरसले
शिंदे सरकारच्या ‘त्या’ निर्णयावरून अजित पवार संतापले, म्हणाले…
मोठी बातमी! नामांतराच्या निर्णयाला शिंदे सरकारकडून स्थगिती
देवेंद्र फडणवीस घेणार राज ठाकरेंची भेट, ‘या’ महत्त्वाच्या मुद्द्यांवर खलबतं होणार?
राज्यात पावसाचा जोर ओसरणार पण…; हवामान विभागाकडून अत्यंत महत्त्वाची माहिती समोर
Comments are closed.