Amol Mitkari | अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका करत त्यांना ‘सुपारीबाज’ असं म्हटलं होतं. मिटकरी (Amol Mitkari ) यांच्या या टिकेनंतर त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. मनसे कार्यकर्त्यांकडून त्यांची गाडी फोडण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
यावर मनसे नेते संदीप देशपांडेंनी प्रतिक्रिया दिली आहे. मनसेसैनिकांनी ही गाडी फोडली असेल तर आम्हाला त्याचा अभिमान आहे, असं देशपांडे म्हणाले आहेत. अमोल मिटकरींनी नुकतीच राज ठाकरेंबद्दल टीका केली होती. त्यानंतर मनसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले.
“दिलेला शब्द पाळणाऱ्या अजित पवारांबाबत सुपारी बहाद्दरांनी बोलू नये. कारण हे सुपारी बहाद्दर, टोल नाका असेल किंवा भोंग्यांचे आंदोलन असेल, असं कोणतेही आंदोलन यशस्वी करू शकलेले नाही”, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली होती. त्यांच्या या टीकेचे पडसाद आज उमटले आहेत. मिटकरी (Amol Mitkari ) यांच्यावर अकोल्यात हल्ला करण्यात आला आहे.
अकोल्यात अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला
या हल्ल्यानंतर मिटकरी यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. “महाराष्ट्राचं नाव घेतात आणि अशाप्रकारे गुंडागर्दी करतात. हा भेकड हल्ला आहे. या हल्ल्यांना मी घाबरत नाही”, असं मिटकरी (Amol Mitkari ) म्हणाले आहेत.
तसंच, “हा हल्ला झाला तेव्हा मी विश्रामगृहात होतो. काही जण मला भेटायला आले होते. त्यासाठी मी येथे आलो होतो. मनसेच्या कार्यकर्त्याने हा हल्ला केला. मी याविरोधात कायदेशीर तक्रार दाखल करणार आहे.”, असा इशारा देखील मिटकरी यांनी दिला आहे.
अमोल मिटकरी नेमकं काय म्हणाले होते?
दरम्यान, राज ठाकरे यांनी पुणे दौरा करत तेथील पुर परिस्थितीवरून राज्य सरकारवर टीका केली होती. अजित पवार पुण्यात नसूनही पुण्यातील धरणं भरली, असं राज ठाकरे म्हणाले होते. त्यांच्या या टीकेला अमोल मिटकरी यांनी तिखट भाषेत प्रत्युत्तर दिलं होतं. राज ठाकरेंना एनडीआरएफचा साधा लाँग फॉर्मही सांगता आला नाही म्हणजे राजकारणातील हा सर्वात मोठा जोक आहे. राज ठाकरे या व्यक्तीची विश्वासार्हता संपली आहे, असं मिटकरी (Amol Mitkari ) म्हणाले होते. त्यानंतर आज त्यांच्या गाडीवर थेट हल्ला करण्यात आल्याची घटना समोर येत आहे.
News Title – Mns leaders attack on amol mitkari car
महत्त्वाच्या बातम्या-
“…तर उद्या एखादा दहशतवादीही नाव बदलून भेटायला येईल”; सुप्रिया सुळे संतापल्या
“चित्रा वाघ यांचे कारनामे माझ्या पेनड्राईव्हमध्ये, सगळं उघड..”; ‘या’ महिला नेत्याचा थेट इशारा
मराठा आंदोलकांचा ताफा थेट ‘मातोश्री’वर; अंबादास दानवे म्हणाले, ही भाजपची माणसं..
मोठी बातमी! अभिनेता शाहरुख खानची तब्येत बिघडली, प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर
रामदेव बाबांना हायकोर्टाचा दणका! ‘त्या’ प्रकरणी पतंजली आयुर्वेदला मोठा दंड