मुंबई | मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आपली सत्ता टिकवण्यासाठी तयारील लागली आहे. दरम्यान शिवसेना संघटक हेमराज शाह यांच्यावर गुजराती मतदारांना सेनेकडे वळवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
शिवसेनेने गुजराती मतदारांना जागृत करण्यासाठी मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याला ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ अशी टॅगलाईन वापरली आहे. यावरून मनसेने सेनेला टोला लगावला आहे.
मुंबई मा जलेबी ने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा… शिवसैनिक झालाय गरीब-बापडा, सत्ताधाऱ्यांना मराठी मतदारच मारतील झापडा, असं मनसेचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.
दरम्यान, शिवसेनेने गुजराती बांधवांच्या मेळाव्यासाठी मराठी आणि गुजराती भाषेत निमंत्रण छापली आहेत. मनसेतच्या या टीकेवर सेनेकडून काय प्रत्युत्तर येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
मुंबई मा जलेबी ने फाफडा,
उद्धव ठाकरे आपडा…शिवसैनिक झालाय गरीब-बापडा,
सत्ताधाऱ्यांना मराठी मतदारच मारतील झापडा! pic.twitter.com/5bPsAiJbgK— Kirtikumar Shinde (@KirtikumrShinde) January 5, 2021
थोडक्यात बातम्या-
शाळेत जाणाऱ्या प्रत्येक मुलीला दररोज मिळणार ‘इतके’ रुपये; आसाम सरकारने घेतला मोठा निर्णय
2 वर्षाखालील बालकांवर कोरोना लसीची चाचणीची तयारी सुरु!
बापमाणूस! आजारी कर्मचाऱ्याला पाहण्यासाठी 83 वर्षाचे टाटा मुंबईहून पुण्याला
गायिका आशा भोसलेंचं Insta account झालं हॅक!
‘सरकारी कर्मचारी आपलं काम करत नाहीत’; शेतकऱ्यानं पंचायत कार्यालयात केली आत्महत्या