Top News महाराष्ट्र मुंबई

लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर मनसेनी केली मुख्यमंत्र्यांकडं ‘ही’ मागणी

मुंबई | आज 16 जानेवारी रोजी कोरोना लसीकरणाला महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण देशभरात सुरुवात होणार आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एक मागणी केली आहे.

उद्धव ठाकरेजी आजपासून महाराष्ट्रा सोबतच देशात पण कोरोना लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. त्यामुळे आता तरी सर्वांसाठी लोकल रेल्वे सेवा चालू करा, अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात पाटील यांनी ट्विट केलं आहे.

नोकरीसाठी मुंबईकडं धावणारा मध्यमवर्ग आपली अर्धी कमाई प्रवासावर खर्च करून व वाहतूक कोंडीत रोज रोज अडकून थकला असल्याचंही राजू पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, लसीकरणाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हीडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मोहिमेचे उद्घाटन करणार आहेत.

थोडक्यात बातम्या-

धक्कादायक!!! प्रेयसीची हत्या करुन तिचा मृतदेह फ्लॅटच्या भिंतीत लपवला

पंतप्रधान शेतकऱ्यांचा आदर करत नाहीत- राहुल गांधी

आपलं कोणी काही करू शकत नाही, अशा भ्रमात राहू नका- अण्णा हजारे

“मुंबई-महाराष्ट्रातील देशी औवेसी कोण? ते लवकरच कळेल”

…यांच्या भजनांसमोर लता मंगेशकरांंचं गाणं फिकं पडतं- भगतसिंह कोश्यारी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या