मुंबई | मराठी भाषेच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अॅमेझॉनला चांगलाय झटका दिलाय. यानंतर आता मनसेने त्यांचा मोर्चा पश्चिम रेल्वेकडे वळवलाय.
पश्चिम रेल्वेने त्यांच्याकडून येणारी माहिती पत्रकं तसंच जाहिरातींमध्ये मराठी भाषेचा वापर अनिवार्य करावा, अशी मागणी मनसेने केली आहे. नसेच्या रेल्वे कामगार सेनेकडून पश्चिम रेल्वेकडे मराठी भाषा अनिवार्य असल्याची मागणी केली गेलीये.
पश्चिम रेल्वेकडून अनेक माहिती पत्रकं तसंच जाहिराती दिल्या जातात. मात्र या पत्रकांमध्ये आणि जाहिरांतीमध्ये प्रत्येकवेळी मराठीचा समावेश केला जात नाही. यासाठी मनसेकडून ही मागणी करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने प्रत्येक राज्यात तिथली भाषा वापरणं बंधनकारक केलं आहे. मात्र तरीही मराठी भाषेचा वापर केला जात नसल्याचं मनसेचं म्हणणं आहे. दरम्यान मागणी मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही मनसेकडून देण्यात आलाय.
पश्चिम रेल्वेने माहिती पत्रके आणि जाहिरातींमध्ये मराठी भाषेचा वापर अनिवार्य करावा महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील यांची मागणी.@mnsadhikrut@WesternRly @Gmwrly @drmbct @srdombct pic.twitter.com/mFfr3SXbae
— महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेना (@MNRKS_IR) December 26, 2020
थोडक्यात बातम्या-
“बोरूबहाद्दर राऊत यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा”
‘माझी राख गंगेत टाकू नका’; कंगणा राणावतनं केलं आणखी एक आवाहन
मोदी उद्घाटन करणार ‘वन नेशन, वन कार्ड’; पाहा काय आहे तुम्हाला उपयोग?
पार्थ पवारांना उमेदवारी देण्याच्या मागणीवर जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य, म्हणाले
गॅस दर कमी केले नाही तर….; रूपाली चाकणकर आक्रमक