बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मनसेच्या एकमेव आमदाराच्या कारचा अपघात!

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार राजू पाटील यांच्या आलिशान कारचा बुधवारी रात्री डोंबिवलीमध्ये भीषण अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. राजू पाटील हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार असून सध्या हिवाळी अधिवेशनानिमित्त ते नागपूरमध्ये आहेत.

राजू पाटील यांची ही महागडी कार ‘मुश्तान्ग’ कंपनीची असून 75 लाख रुपये या कारची किंमत आहे. अपघातात या कारचा चक्काचूर झाला आहे. बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास कारचा ड्रायव्हर पेट्रोल भरुन येत होता. कार पलावा सिटीजवळील रेल्वे उड्डाणपुलावर असताना चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

भरधाव वेगात असलेली कार थेट खालून जाणाऱ्या कोकण रेल्वे रुळावर कोसळली. सुदैवाने कार चालकाने गाडीतून वेळीच उडी मारल्याने तो बचावला. पण अपघातात महागडया कारचा मात्र चक्काचूर झाला आहे.

दरम्यान, प्रमोद उर्फ राजू रतन पाटील हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मनसेने एकूण ११० जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यात फक्त राजू पाटील यांच्या कल्याण ग्रामीणच्या एकमेव जागेवर मनसेला विजय मिळवता आला.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More