मुंबई | महाराष्ट्रात काही वाहनांवर मराठीमध्ये नंबर प्लेट असलेली दिसते. मात्र वाहतूक पोलिसांकडून मराठीत नंबर असलेल्या वाहनांवर कारवाई होते. यावरून मनसे आमदार राजू पाटील यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना पत्र लहिलं आहे.
मराठी भाषेत नंबर प्लेट लावण्यास परवानगी नसेल तर तातडीने तसा कायदा करुन परवानगी द्यावी आणि महाराष्ट्रातच मराठी भाषिकांची होत असलेली गळचेपी थांबवावी, अशी मागणी राजू पाटील यांनी मंत्री अनिल परब यांना पत्राद्वारे केली आहे.
वास्तविक महाराष्ट्रासाठी मराठी भाषेत नंबर प्लेट लावण्याबाबत राज्य सरकार आग्रही असले पाहिजे होते. तसा महाराष्ट्रात कायदाच केला पाहिजे होता, असं पाटील यांनी पत्रात म्हटलं आहे.
दरम्यान, मराठी भाषेची सरकारकडूनच गळचेपी होत असेल तर भाषेचे संवर्धन आणि आपली मराठी अस्मिता कशी जपली जाईल? असा प्रश्न निर्माण होतो, असंही पाटील म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
“नारायण राणेंना त्यांच्या मुलांपासूनच खरा धोका आहे”
“आमदारकीसाठी बारामतीला जाऊन आमरस अन् गोड चहा घेणं सोडा”
देशांतर्गत वापरासाठी पुण्याहून सिरमच्या कोरोना वॅक्सिनची पहिली बॅच रवाना
नितेश राणे हे पहिले हँग ते चाराण्यासारख्या गोष्टी करतात- अब्दुल सत्तार
वरुण द्या, खालून द्या…, मनात असेल त्यांना सुरक्षा द्या- देवेंद्र फडणवीस