मनसे आमदार राजू पाटील यांची तळीये दरडग्रस्तांना 11 लाखांची मदत
रायगड | मुसळधार पावसामुळे राज्यातील कोकण विभागाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले तर दुकानांमध्ये पाणी शिरल्याने मालाचंही नुकसान झालं आहे. रायगड जिल्ह्यामधील तळीये गावात दरड दुर्घटना घडली होती. त्यामध्ये 84 लोकांना आपल्या प्राणांना मुकावं लागलं होतं. यानंतर राज्यातील नेते पूरस्थिती भागाची पाहणी करण्यासाठी दौरा करताना दिसत आहेत. अशातच प्रकारे मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनीही तळीये गावाची पाहणी केली.
तळीये गावाची पाहणी करताना राजू पाटील यांनी दरडग्रस्तांसाठी आर्थिक मदत केली आहे. तळीये गावाच्या पुनर्वसनासाठी राजू पाटील यांच्याकडून अकरा लाखांची मदत करण्यात आली. त्या रकमेचा चेक ग्रामपंचायतीच्या नावाने सरपंचाकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
या पाहणीवेळी राजू पाटलांसोबत मनसे नेते मनोज चव्हाण, जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड, उपजिल्हा अध्यक्ष चेतन उतेकर पदाधिकारी आणि मनसेचे नेते उपस्थित होते. या दुर्घटनेतून सावरण्यासाठी महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी महत्त्वाची घोषणा केली होती.
दरम्यान, महाड आणि तळीये हे गावं वसवण्याची पूर्ण जबाबदारी म्हाडा घेत असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं होतं. तर सरकारने आज पूरग्रस्तांसाठी 11 हजार 500 कोटींच्या पॅकेजला मंजुरी दिली आहे.
थोडक्यात बातम्या-
पुणे कोरोना अपडेट! जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर
शरद पवारांशिवाय संसद शांत वाटते- लालू प्रसाद यादव
शिबानी दांडेकरने रिया चक्रवर्तीबाबत केला ‘हा’ मोठा खुलासा
“सामान्य मुंबईकरांना छळण्यात ठाकरे सरकारला कसा विकृत आनंद मिळतो हे दिसलं”
अमित शहा आणि शरद पवारांच्या आजच्या बैठकीत नेमकं काय घडलं? पवार म्हणाले…
Comments are closed.