तरुणीला अश्लील मेसेज पाठवणाऱ्या परप्रांतीय तरुणाला मनसे पदाधिकाऱ्यांकडून चोप, पाहा व्हिडिओ
ठाणे | तरुणीला अश्लील मेसेज पाठवणाऱ्या परप्रांतीय तरुणाला मनसे पदाधिकाऱ्यांनी चांगलाच चोप दिला आहे. संबंधित तरुण हा एसी मॅकेनिक आहे. तो गेल्या काही दिवसांपासून तरुणीला वारंवार अश्लील मेसेज पाठवत होता. त्यामुळे तरुणी वैतागली होती. अखेर या प्रकरणाची माहिती मिळताच मनसे पदाधिकाऱ्यांनी तरुणाच्या कार्यालयात जावून चोप दिला. तरुणाला मारहाण करताना व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
डोंबिवली पूर्वेतील देसले पाडा परिसरात राहणारा एक परप्रांतीय तरुण एका मराठी तरुणीस वारंवार अश्लील मेसेज पाठवायचा. त्यामुळे संबंधित तरुणी त्रस्त झाली होती. अखेर या प्रकरणाची माहिती मिळताच मनसेचे रस्ते आस्थापना डोंबिवली शहराध्यक्ष ओम लोके आणि शाखा प्रमुख रितेश माळी हे त्याठिकाणी पोहचले. एसी दुरुस्त करणाऱ्या कंपनीच्या कार्यालयात भीम सहानी तरुण काम करतो. त्याच कार्यालयात ती तरुणीही काम करते. काही दिवसांपासून भीम सहानी हा तरुण त्या तरुणीला अश्लील मेसेज पाठवत होता. त्यामुळे तरुणी त्रस्त झाली होती.
मनसे पदाधिकाऱ्यांनी अखेर त्या कार्यालयात धाव घेत एसी मॅकेनिक भीम सहानी याला गाठले. त्याला तिथेच चोप दिला. यापूढे या तरुणीला कोणताही मेसेज पाठविणार नाही, अशी हमी भीम सहानी याने दिली. मूळचा उत्तर प्रदेशात राहणारा हा तरुण तीन वर्षांपूर्वी डोंबिवलीला आला आहे. तो एसी मॅकेनिक आहे.
दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत मनसे पदाधिकारी मारहाण करताना दिसत आहे. याशिवाय संबंधित तरुण हा माफी मागताना दिसत आहे. त्याचबरोबर आपण यापुढे अशा प्रकारचं कृत्य करणार नाही, असंही तो म्हणत आहे.
तरूणीला अश्लील मेसेज पाठणाऱ्या तरूणाला मनसे पदाधिकाऱ्यांकडून चोप @mnsadhikrut @TV9Marathi pic.twitter.com/jIYTn2HT9o
— CHETAN PATIL (@chetanpatil1313) March 23, 2021
थोडक्यात बातम्या –
‘शरद पवारांच्या पाठिंब्याचा आदरच, पण…’; नवनीत राणांचं रूपाली चाकणकरांना जोरदार प्रत्युत्तर
पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा ‘हा’ मित्रपक्ष ठरणार डोकेदुखी?
एक रात्र माझ्यासोबत घालव!; अंकिता लोखंडेचा निर्मात्याबाबत धक्कादायक खुलासा
सचिन वाझेंची 200 पानी डायरी NIA च्या हाती; वाझेंची आर्थिक गुपितं होणार उघड?
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा महाविद्यालयांना मोठा झटका!
Comments are closed.