मनसेच्या फेरीवाला हटाव मोहिमेचं लोण आता पुण्यात!

पुणे | मुंबईत अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसेनं आक्रमक भूमिका घेतली असताना आता हे लोण पुण्यात येऊन पोहोचलं आहे. मनसे पुणे शहर अध्यक्ष अजय शिंदे यांनी याबाबत महापालिका आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. 

2 दिवसात अनधिकृत फेरीवाले हटवा अन्यथा आमचं लक्ष्य अनधिकृत फेरीवाल्यांसोबतच मनपाचे अधिकारीही असतील, असा इशारा या पत्रातून देण्यात आला आहे. 

मनसेच्या या पत्रावर पालिका काय पाऊल उचलते ते पाहणं महत्त्वाचं आहे. 

मनसेचं पत्र-