महाराष्ट्र मुंबई

मनसेचा ठाण्यात शेतकरी मोर्चा; सरकारविरोधात पुकारणार एल्गार

मुंबई | ठाण्यातील आंबा स्टॉल लावण्यावरुन झालेल्या वादानंतर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ठाण्यात 17 मे रोजी मनसेकडून शेतकरी मोर्चा काढण्यात येणार आहे.

या मोर्चासाठी मनसेचे नेते तसेच राज्यातून जवळपास 5 हजार शेतकरी उपस्थित राहतील, असा विश्वास मनसेचे पालघर आणि ठाणेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी व्यक्त केला आहे.

आंबा स्टॉल लावला म्हणून भाजप नगरसेवकाकडून सचिन मोरे या शेतकऱ्याला 20 हजार रुपयांची मागणी केली. शेतकऱ्याने पैसे देण्यास नकार दिल्याने पालिकेकडून त्या शेतकऱ्यावर कारवाई करण्यात आली.

आंबा स्टॉलसाठी परवानगी मागितली असताना ती नाकारल्याचं कोणतंही ठोस कारण महापालिकेकडे नाही. त्यामुळे येत्या 17 तारखेला ठाण्यात शेतकरी मोर्चा काढणार असल्याचं जाधव यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या

-…म्हणून मोदी हटाओ हाच त्यांचा अजेंडा आहे- नरेंद्र मोदी

-ही भारतीय तरुणी ठरली जगातील पहिली महिला अटलांटिक ओलांडणारी

-राफेल कागदपत्रं गहाळ प्रकरणाची सुरक्षा खात्याकडून अंतर्गत चौकशी

-या प्रश्नासाठी शरद पवार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट!

-“कुलदीप यादव आणि माझ्या यशामागे धोनी”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या