महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं ‘पद्मावत’ला संरक्षण नाही!

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पद्मावत सिनेमाला संरक्षण असल्याच्या बातम्या काही माध्यमांनी दिल्या होत्या. मात्र हे वृत्त मनसेनं खोडून काढलंय. मनसेकडून यासंदर्भात अधिकृत पत्रक काढण्यात आलंय. 

शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केलेलं मत त्यांचं वैयक्तीक मत आहे, असं मनसे चित्रपट सेनेच्या अमेय खोपकर यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे मनसेचे प्रवक्ते अविनाश अभ्यंकर यांनी सिनेमाला संरक्षण ही पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचं सांगितलंय.

पद्मावत सिनेमा प्रदर्शनानिमित्ताने त्याला होणाऱ्या विरोधानं टोक गाठलंय. अनेक ठिकाणी जाळपोळीसारखे प्रकार घडलेत. मनसेनं यापासून दूर राहणं पसंत केलंय.