“साहेब जैसा जैसा बोले हा तैसा तैसा चाले म्हणून यांचे आस्तित्व बुडाले”
मुंबई | शिवसेना पक्ष डबघाईला आल्याने आता त्यांचे कट्टर विरोधक आणि हाडवैरी असलेला मनसे (MNS) पक्ष आणि नेते त्यांच्यावर तुटून पडले. गेेले अनेक दिवस शिवसेना आणि मनसे पक्षात शाब्दिक युद्ध सुरुये. आता शिवसेनेच्या बंडानंतर प्रथमच सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची एक सनसनाटी मुलाखत घेतली. या मुलाखतीवर मनसेने टीका केली आहे.
मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी या मुलाखतीवर एक व्यंगचित्र (Cartoon) शेअर करत भाष्य केलं आहे. साहेब, जैसा जैसा बोले हा तैसा चाले म्हणून यांचे अस्तित्व बुडाले, अशा आशयाचं त्यांनी ट्विट केेलं आहे. या व्यंगचित्रात संजय राऊत आणि उद्धव ठाकरे दिसत आहेत. त्यात संजय राऊत ठाकरेंना एक कागद देत म्हणत आहेत, हे घ्या साहेबांनी पाठवलेले मुलाखतीचे प्रश्न आणि उत्तरे. त्यांच्या डाव्या हातात राष्ट्रवादीचे निवडणूक चिन्ह घड्याळ दिसत आहे.
त्यावर त्यात उद्धव ठाकरे म्हणत आहेत, बघा आता कशी देतो मी खणखणीत उत्तरे, अशा स्वरुपाचं हे व्यंगचित्र आहे. चित्रात एक स्टुडिओ दिसत आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी मनसे नेत्या शालिनी ठाकरे (Sharmila Thackeray) यांनी शिवसेनेला डिवचलं होतं. धनुष्यबाण आता डोहाळे जेवणासाठी भाड्याने देण्याची वेळ आली आहे, असं त्या म्हणाल्या होत्या.
या मुलाखतीत ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर सडकून टीका केली आहे. त्यात त्यांनी त्यांच्यावर शिवसेना फोडल्याचे आरोप केले आहेत. तसेच त्यांनी मुख्यमंत्रीपदाची हाव सुटली होतीच आता त्यांना शिवसेना पक्षप्रमुखपद हवं आहे. ज्या शिवसेनेने आई म्हणून यांना जन्म दिला त्याच शिवसेनेचा म्हणजे आपल्या आईचा जीव घेण्यासाठी हे लोक पुढे सरसावले आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
|| ‘साहेब’ जैसा जैसा बोले
हा तैसा तैसा चाले
म्हणून यांचे आस्तित्व बुडाले || pic.twitter.com/0T2906UAsS— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) July 26, 2022
थोडक्यात बातम्या –
‘एकनाथ शिंदेंची भूक अजून भागली नाही का?’; अजित पवारांची मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका
‘जन्म दिला त्याच आईला गिळायला निघालेली ही अवलाद’; उद्धव ठाकरेंनी बंडखोरांना सुनावलं
जितेंद्र आव्हाडांची बाबासाहेब पुरंदरेंवर टीका, म्हणाले…
राष्ट्रपतींचा शपथविधी 25 जुलैलाच का होतो?, वाचा सविस्तर
अविवाहितेच्या मुलांना फक्त आईचं नावही लावता येणार, ‘या’ उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Comments are closed.