MNS party | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा फटका बसला आहे. पक्षाला एकाही जागेवर यश मिळालं नाही. मनसेचा एकही आमदार निवडून आला नाही. या पराभवाचा मोठा फटका मनसेला बसणार आहे. मनसेचा एकही उमेदवार निवडून न आल्यामुळे पक्षाची मान्यता रद्द होऊ शकते, अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे. (MNS party )
मनसे पक्षाची विधानसभा निवडणुकीतली कामगिरी पाहता आयोग त्यांना नोटिस पाठवू शकते, असं म्हटलं जातंय. एखाद्या पक्षाला मान्यता टिकवण्यासाठी निवडणूक आयोगाने घालून दिलेले काही निकष पूर्ण करावे लागतात. त्यानुसार पक्षाला एकूण 8 टक्के मतदान आणि 1 जागा किंवा 2 जागा आणि 6 टक्के मतदान किंवा 3 जागा आणि 3 टक्के मतदान यापैकी एक निकष पूर्ण करणं आवश्यक आहे.
मनसेची मान्यता रद्द होणार?
या निकषानुसार, मनसेचा एकही आमदार निवडून आलेला नाही. तसेच, 48 लाख मते मनसेला पडली असतील, असं चित्र तरी दिसून येत नाही. त्यामुळे ‘आपल्या पक्षाची मान्यता का काढण्यात येऊ नये’, असा प्रश्न आयोगाकडून मनसेला विचारला जाऊ शकतो. आता यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे. (MNS party )
मनसेची मान्यता रद्द झाली तर त्याचा पक्ष म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर काय परिणाम होईल?, याबाबतही वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. मान्यता काढली म्हणजे मनसेचं नाव वगैरे काढलं जाणार नाही. त्यांचं चिन्ह इंजिन आहे. ते त्यांना प्रत्येक निवडणुकीत कायद्यानं मिळतं. पण मान्यता रद्द झाल्यास यापुढे त्यांना ते चिन्ह मिळू शकणार नाही, असं म्हटलं जातंय.
विधानसभेतील मनसेची कामगिरी-
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 1.55 टक्के मतं मिळाली. मनसेचा एकही उमेदवार विधानसभेत निवडून आला नाही. त्यामुळे मनसेच्या मान्यतेबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मनसेच्या 26 उमेदवारांना 1 हजारांहून कमी मतं मिळाली आहे. यावेळी राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे सुद्धा पहिल्यांदाच माहीममधून उभे होते. मात्र, त्यांचाही निवडणुकीत पराभव झाला आहे. (MNS party )
News Title – MNS party may be de-recognised
महत्त्वाच्या बातम्या-
लाडक्या बहीणींसाठी गुड न्यूज, ‘या’ तारखेला 2100 रुपये मिळणार?, मुख्यमंत्र्यांची घोषणा
RSS कडूनही ग्रीन सिग्नल, महायुतीत देवेंद्र फडणवीच होणार मुख्यमंत्री?
आज सोमवारी ‘या’ तीन राशींवर बरसणार भोलेनाथांची कृपा!
‘महाराष्ट्र हरलास तू…’, तेजस्विनी पंडीतने राज ठाकरेंसाठी केलेली ‘ती’ पोस्ट तूफान व्हायरल!
अजित पवारांना मिळालेल्या यशामागचं कारण शरद पवारांनी सांगितलं, म्हणाले…