बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“प्रकरण बाहेर आलं तर फटाक्यांची माळ लागेल”, राज ठाकरेंचा नेमका रोख कुणाकडे?

औरंगाबाद | काही महिन्यांपूर्वी उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या मुंबईतील अँटिलिया (Antilia) निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली चारचाकी आढळ्याने सगळीकडे एकच खळबळ उडाली होती. त्या ठिकाणी जिलेटिनच्या कांड्या सापडल्या होत्या. या घटनेनंतर सर्वत्र एकच खळबळ उडाल्याचं पहायला मिळालं होतं. अशातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी या प्रकरणावर मोठं वक्तव्य केलं आहे.

सचिन वाझे हा शिवसेनेचा माणूस आहे. मुकेश अंबानी हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चांगले मित्र आहे. मग एका जवळच्या माणसाने दुसऱ्याच्या घराखाली स्फोटकाची गाडी का ठेवली?, असा साधा सोपा प्रश्न मला पडलाय, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. या प्रश्नाच्या उत्तराचा शोध लागला तर फटाक्यांची माळ लागेल, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

अंबानींच्या घराजवळ गाडी ठेवण्यात आली होती या प्रकरणावर फोकस न राहता मुद्दा दुसऱ्याच विषयावर भरकटत जाईल हे मी आधीच म्हणालो होतो, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर त्यांनी ओबीसी आरक्षण, बेरोजगारी, निवडणुका, महाविकास आघाडी, भाजप-मनसे युती या विषयावर भाष्य केलं आहे.

दरम्यान, राज ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं आहे. भाजप मनसे युतीवर भाष्य करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता भाजप मनसे युतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहे.

थोडक्यात बातम्या-

मनसेचा अजेंडा काय? राज ठाकरे म्हणतात, “सध्या आघाडीचे दिवस पण…”

भाजपच्या 12 आमदारांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाने दिला ‘हा’ निर्णय

‘हा तर घोडेबाजार’; नागपूरातील पराभवानंतर नाना पटोलेंची प्रतिक्रिया

MLC Election: देवेंद्र फडणवीसांना मिठी मारताच बावनकुळे यांना अश्रू अनावर

‘रडीचा डाव खेळू नका, आता… ‘; चंद्रकांत पाटलांचं महाविकास आघाडीला खुलं आव्हान

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More