बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज ठाकरे अॅक्शन मोडवर! महाराष्ट्र दौरा करणार, 6 डिसेंबरला पुण्यात

मुंबई | सध्या सर्वत्र निवडणुकांची (Elections) तयारी जोरात चालू आहे. राज्यात येत्या काळात महापालिकेच्या निवडणुका (Munivipal Corporation) होणार आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, या मोठ्या महापालिकांचा (Mumabai, Pune, Nagpur, Aurangabad) यात समावेश आहे. परिणामी प्रत्येक राजकीय पक्षानं आतापासूनच तयारी चालू केली आहे. अशातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thakarey) हे महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत.

राज ठाकरे गत काही दिवसांपासून आपल्या मुंबईतील नव्या निवासस्थानी राज्यभरातील नेत्यांच्या भेटीगाठी घेत होते. परिणामी या भेटीगाठीतून राज्यभराचा दौरा ठरला असल्याची माहिती मिळत आहे. राज ठाकरे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्यानं ते सार्वजनिक कार्यक्रमांना जात नव्हते. पण आता तब्येत पुर्ण बरी झाल्यानंतर राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दौऱ्याचं नियोजन केलं आहे.

राज ठाकरे आपला दौरा 6 डिसेंबरपासून सुरू करणार आहेत. पहिल्यांदा ते पुण्यामध्ये आपल्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. आगामी पुणे महापालिका निवडणुकीत मनसेला पुणे शहरात अधिक जागा जिंकण्याची अपेक्षा आहे. या अगोदरही राज ठाकरे यांनी सातत्यानं पुणे शहराचा दौरा केला आहे. त्यांनतर राज ठाकरे यांचा दौरा हा मराठवाड्यात आहे. मराठवाड्याची राजधानी मानली जाणारी औरंगाबाद येथे ते आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.

दरम्यान, राज ठाकरे आपल्या दौऱ्यादरम्यान राज्यातील विविध सहा ठिकाणी जाणार आहेत. राज ठाकरे हे कोकण दौऱ्यावर सुद्धा जाणार आहेत. पण त्या दौऱ्याची तारीख अद्यापी ठरलेली नाही. राज ठाकरे आपल्या पक्षाला नव्यानं उभारी देण्याचा प्रयत्न करत आहेत.

थोडक्यात बातम्या 

“लोकांनी इंदिरा गांधींना ज्या पद्धतीने उत्तर दिलं, तसंच उत्तर आता मोदींनाही मिळेल”

भारतासाठी दिलासायक बातमी! Omicron विरुद्ध ‘ही’ लस ठरु शकते अधिक प्रभावी

“ममता मोदींच्या इन्फॉर्मर, त्या विरोधकांना फोडून कमकुवत करत आहेत’”

एटीएममधून पैसे काढणाऱ्यांना झटका, मोजावे लागणार इतके रूपये

…त्यातून नागपूरने 325 कोटी कमवले, काहीच टाकाऊ नसतं-नितीन गडकरी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More