बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“लोकांनी एकाचवेळी दोन ते तीन वेळा बटनं का दाबायची?”; राज ठाकरेंचा सवाल

मुंबई | राज्यात आगामी महानगरपालिका, नगरपालिकांसाठी बहुसदस्यीय प्रभागाची तरतूद लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. त्यासाठी राज्य सरकारने तीन, दोन, आणि एकदिवस्यीय व्यवस्था जाहीर केली आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. ते नाशिकमध्ये पत्रकार परिषेद बोलत होते.

अशी कोणतीही पद्धत राज्यात कुठेही अस्तित्वात नसताना महाराष्ट्रात हे कुठुन आणि का सुरू झालं आहे. सगळीकडे आमदारकी, पालिका, ग्रामपंचायतीपर्यंत एकच उमेदवार हीच पद्धत आहे.  याचं एकमेव कारण सत्ता काबीज करणं आहे. त्याचबरोबर लोकांनी एकावेळी दोन ते तीन वेळा बटनं का दाबायची. याची निवडणुक आयोगाने दखल घ्यायला हवी, अशी टीकाही राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर केली आहे.

2012 मध्ये राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसचं सरकार होतं. तोपर्यंत एकच उमेदवार पद्धत होती. तेव्हा त्यांनी 2 उमेदवारांच्या प्रभागाची रचना केली. त्यानंतर भाजपने 4 उमेदवारांचा प्रभाग केला. त्यानंतर या सरकारने एका प्रभागाची रचना केली. त्यानंतर निवडणुक आयोगानंही एकाच उमेदवारांचा प्रभाग करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर काल पुन्हा या सरकारने 3 उमेदवारांचे प्रभाग आणले आहे. असंही राज ठाकरे म्हणाले.

दरम्यान,  पुढील वर्षी मुंबई, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नागपूर, अमरावती, आणि अकोला या महापालिकेच्या निवडणुका होत आहे. त्यासाठी राजकीय पक्ष जोरदार तयारी करताना दिसत आहे.

थोडक्यात बातम्या- 

कागलनंतर सोमय्यांच्या रडारवर पारनेर साखर कारखाना!

ओबीसी आरक्षणाबाबत धक्कादायक माहिती समोर!

मोठी बातमी! नाना पटोले आणि बाळासाहेब थोरातांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

‘या’ भारतीय कंपनीची इलेक्ट्रीक बाईक बाजारात दाखल; किंमत पेट्रोल बाईकपेक्षा कमी

“सरकारने घेतलेला निर्णय राजकीय सुडापोटी, अशा चौकशांना मी घाबरत नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More