बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, सर्व पुर्वनियोजित कार्यक्रम रद्द

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची तब्येत खालावल्याची बातमी समोर आली आहे. या कारणामुळे मुंबई-पुण्यात होणारे सर्व मेळावे देखील रद्द करण्यात आले आहे. हे मेळावे अध्यक्ष राज ठाकरे संबोधित करणार असल्यामुळे मेळाव्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र अचानक हे मेळावे रद्द करण्यात आले आहेत.

मनसे सचिव सचिन मोरे यांनी पक्षाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून याची माहिती दिली आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शनिवारी 23 रोजी मुंबईत तर 24 रोजी पुणे येथे होणाऱ्या शाखाध्यक्षांचा मेळावा काही अपरिहार्य कारणांमुळे पुढे ढकलण्यात आला असल्याचे त्यांनी ट्विट केलं आहे.

मनसेने भांडूप येथे 23 ऑक्टोबर रोजी तर 24 ऑक्टोबरला पुण्यात शाखाध्यक्षांचे मेळावे आयोजित केले होते. मात्र राज ठाकरे यांची तब्येत अचानक बिघडल्याने आता हे मेळावे रद्द करण्यात आले आहेत.

दरम्यान, मनसेच्या अधिकृत अकाउंटवरून शेअर करण्यात आलेल्या माहितीमध्ये हे मेळावे पुन्हा एकदा लवकरच आयोजित करण्यात येतील, अशी माहिती देण्यात आली आहे. तसेच या मेळाव्याची तारीख, वेळ आणि ठिकाण देखील लवकरच जाहीर करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे देखील ट्विटमध्ये म्हटले आहे.

थोडक्यात बातम्या-

‘हे तुझं प्रोडक्शन हाऊस नाही, इथे अधिकारी तुझी…,’ समीर वानखेडेंनी अनन्याला सुनावलं

कच्च्या तेलाच्या दरात घसरण पण पेट्रोल आणि डिझेलचे दर…

“ओ भाई… मारो मुझे… मारो” म्हणणारा मुलगा आठवतोय? तो आता परत आलाय, पाहा काय म्हणाला

भरसभेत छगन भुजबळांनी दिलं किरीट सोमय्यांना खुलं आव्हान, म्हणाले…

सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तर…, नितीन राऊतांच्या ट्विटवर संजय राऊतांची तिखट प्रतिक्रीया

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More