मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा बाळा नांदगावकरांना मोठा धक्का

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी  बाळा नांदगावकर यांना मोठा धक्का दिलाय. नांदगावकर समर्थक असलेल्या भायखळा आणि शिवडी विभागप्रमुखांची उचलबांगडी करण्यात आलीय. 

थेट राज ठाकरे यांच्याशी संपर्क होत नाही, अशी ओरड गेल्या काही दिवसांपासून मनसैनिकांमध्ये ऐकायला मिळतेय. त्यापार्श्वभूमीवर संघटना बांधणीचे काम राज यांनी पुन्हा हाती घेतलंय. 

दरम्यान, मनसेशी संलग्न असलेल्या जवळपास सर्वच संघटनांची पदं बरखास्त करण्यात आली असून नव्याने नियुक्त्या होणार आहेत. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या