मनसेप्रमुख राज ठाकरे घेणार शरद पवार यांची थेट मुलाखत!

पुणे | मनसेप्रमुख राज ठाकरे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेणार आहे. येत्या 3 जानेवारीला पुण्यातील बीएमसीसी मैदानावर हा कार्यक्रम पार पडणार आहे. 

शरद पवार यांच्या संसदीय कारकीर्दीला नुकतीच 50 वर्षे पूर्ण झाली, त्यानिमित्ताने प्रसिद्ध हास्यकवी रामदास फुटाणे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलंय. विशेष बाब म्हणजे ही मुलाखत ‘मॅच फिक्सिंग’ नसणार आहे, म्हणजेच शरद पवार यांना प्रश्न काय असणार हे सांगण्यात येणार नाहीये.

दरम्यान, शरद पवार यांच्या अलिकडच्या काळात अनेक मुलाखती झाल्या, मात्र लक्षात राहील अशी मुलाखत कोण घेईल, याचा आयोजनकर्त्यांकडून शोध सुरु होता. अखेर राज यांचं नाव निश्चित करण्यात आलं.