राज ठाकरेंचं व्यंगचित्र जिव्हारी, शिवसैनिकांकडून प्रत्युत्तर

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख यांच्यावर व्यंगचित्राच्या माध्यमातून जहरी टीका केली होती. ही टीका शिवसैनिकांच्या चांगलीच जिव्हारी लागली असून राज यांच्याविरोधात सोशल मीडियावर व्यंगचित्र शेअर केले जात आहेत. 

मनसेतील पक्षांतराच्या मुद्द्याकडे या व्यंगचित्रांमधून लक्ष वेधण्यात आलं आहे. सध्यातरी अशा आशयाची दोन व्यंगचित्रं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केली जात आहेत. 

दरम्यान, राज यांनी उद्धव यांच्या धरसोड वृत्तीचं अचूक वेध घेणारं व्यंगचित्र काढलं होतं. हे व्यंगचित्रही सोशल मीडियात चांगलंच व्हायरल झालंय.