Top News महाराष्ट्र मुंबई

रजमान सणासाठी रस्ते भरणार आणि बाकीचे रस्त्यावर आलं की काठ्या? असं कसं चालेल- राज ठाकरे

मुंबई | मुस्लिम बांधवांच्या रमजान सणासाठी रस्ते भरलेत. म्हणजे त्यांच्या सणासाठी रस्ते भरणार ते कसेही रस्त्यावर येणार? आम्ही रस्त्यावर आलं की काठ्या?? असं कसं चालेल… नियम सगळ्यांना सारखे पाहिजेत ना.. आपली लोकं रस्त्यावर आली की त्यांना बाबू खायला लागणार हे काही बरोबर नाही, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रमजाननिमित्त रस्त्यावर खरेदीसाठी होत असलेल्या गर्दीकडे बोट दाखवलं. ते एबीपी माझाच्या विशेष कार्यक्रमात बोलत होते.

ज्यावेळी अश्या प्रकारे संकट येतं त्यावेळी कोणत्याही प्रकारचा धर्म असता कामा नये. त्यावेळी सगळ्यांना समान न्याय आणि वागणूक असली पाहिजे. सगळ्यांना सगळ्यांचा धर्म आहेच की? आम्हाला नाही का आमचा धर्म? आमचे सण आणि उत्सव आम्ही घरामध्ये साजरे केले. अगदी 14 तारखेची आंबेडकर जयंती माझ्या दलित बांधवांनी घरामध्ये साजरी केली. सगळ्या धर्माची लोक आपापले सण उत्सव घरामध्ये साजरे करतायेत मग अशा ठराविक लोकांसाठी अशा गोष्टी का होतायेत? असा सवाल राज यांनी यावेळी उपस्थित केला.

अशा काळात तुम्हाला काही कठोर निर्णय घ्यावे लागतात आणि तसे निर्णय घेणं देखील गरजेचं असतं. सगळ्याच गोष्टी तुम्हाला अधिकारी वर्ग सांगणार आहे अशातला काही भाग नसतो, असं म्हणत आता यापुढे सरकारला स्पष्ट आणि कठोर निर्णय घेण्याची गरज असल्याचं राज यांनी सांगितलं.

दुसरीकडे सरकारने जर फक्त दोन तासच जर दुकाने उघडण्याला परवानगी दिली तर गर्दी ही होणारच. दुकाने उघडी ठेवायला काय हरकत आहे. लोक अंतर ठेऊन त्यांना जे हवं ते खरेदी करतील की… असंही राज यावेळी म्हणाले.

ट्रेंडिंग बातम्या-

किम जोंग उनच्या तब्येतीबद्दल नवी माहिती समोर!

पुण्यात नव्याने 93 कोरोनाबाधितांची नोंद; पूर्व भागात रूग्ण का वाढतायेत?

महत्वाच्या बातम्या-

मंत्रिमंडळात समन्वय नाही, एकत्र बसून निर्णय घेतले जात नाहीत- राज ठाकरे

“यापुढे हिंदुस्थान-पाकिस्तान अन् धर्म-जातीवादाची प्यादी बंद करून आर्थिक प्रश्नावर काम केलं पाहिजे”

“राहुल गांधी-रघुराम चर्चेने आर्थिक विषाणू किती गंभीर आहे समोर आलंय; आता शहाणं व्हायची वेळ”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या