मुंबई | मनसे नेते नितीन नांदगावकर यांनी पक्षाला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ करत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यांचा शिवसेना प्रवेश मनसेच्या चांगलाच जिव्हारी लागलाय. कोण नितीन नांदगावकर? असं म्हणत मनसे नेते राजू पाटील यांनी आपला राग आणि संताप व्यक्त केला आहे.
‘कोण नितीन नांदगावकर ? आमच्या पक्षामध्ये नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर आणि आमच्यासारखे मनसैनिक आहेत, असं राजू पाटील म्हणाले आहेत.
बाळासाहेब ठाकरे यांच्याभोवती असणाऱ्या बडव्यांमुळे राज ठाकरेंनी शिवसेना सोडली होती. राज ठाकरे हे माझे दैवत आहेत आणि राहतील. पण त्यांच्या भोवती असलेल्या बडव्यांमुळे मला मनसे सोडावी लागली, असं स्पष्टीकरण नांदगावकर यांनी दिलं आहे.
दरम्यान, नितीन नांदगावकर यांना मनसेचं विक्रोळी विधानसभा मतदारसंघातून तिकीट हवं होतं. मनसे त्यांना तिकीट देखील देणार होती. मात्र त्यांना उमेदवारी देण्याअगोदर त्यांनी शिवसेनात प्रवेश केल्याने मनसे आक्रमक झालेली पहावयास मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या-
गडकरींसंदर्भात आशिष देशमुखांनी केलेल्या वक्तव्यामुळे एकच खळबळ https://t.co/fZTXlNlP2f @BJP4Maharashtra
— थोडक्यात (@thodkyaat) October 5, 2019
“माझ्यातली पंकजा मुंडे केव्हाच संपलीये… मी आता गोपीनाथ मुंडे धारण केलाय” – https://t.co/H90p6yVNQ8 @Pankajamunde @dhananjay_munde @NCPspeaks
— थोडक्यात (@thodkyaat) October 5, 2019
राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत गेलेले माजी खासदार म्हणतात; मी कायम पवारांसोबतच! https://t.co/HtRYFQHapa @NCPspeaks @Shivsena
— थोडक्यात (@thodkyaat) October 5, 2019
Comments are closed.