मुंबई | आज गुढीपाडवा.. अर्थात हिंदु नववर्षाचा पहिला दिवस… आणि गेली 11 वर्षे अव्याहतपणे चालणारा मनसेचा पाडवा मेळावा… आज (शनिवार) संध्याकाळी 7 वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे मनसैनिकांना शिवाजी पार्कवर संबोधित करणार आहेत.
“अन्यायाविरूद्ध बंड पुकारणे हाच खरा महाराष्ट्र धर्म; चला शिवतीर्थावर…” असं म्हणत मनसेनं सभेअगोदरची वातावरण निर्मिती केली आहे आणि आपले इरादे स्पष्ट केले आहेत.
चला शिवतीर्थावर…#मनसे #पाडवामेळावा #राजठाकरे #RajThackeray #Gudhipadwa2019 pic.twitter.com/in9X4gxRf1
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) April 6, 2019
गेल्या काही दिवसांपासून भाजप सातत्याने राज ठाकरेंवर हल्लाबोल करत आहेत. मग बारामतीचा पोपट असू किंवा मिमिक्री करणार कलाकार असो… अशी विशेषणं भाजप त्यांना लावत आहेत. राज ठाकरे आज संध्याकाळी या सगळ्यांचा कसा समाचार घेणार? काय बोलणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज कुणाला पाठिंबा देणार? कुठल्या मतदारसंघात सभा घेणार? कुणासाठी सभा घेणार? याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.
महत्वाच्या बातम्या-
-‘न्याय’ योजनेसाठी लागणारा पैसा श्रीमंतांकडून वसूल करु- राहुल गांधी
–संजय राऊतांकडून छगन भुजबळांचा आसाराम बापु म्हणून उल्लेख!
-यूपीएससीत पहिला क्रमांक पटकावला; आई-वडिलांसोबत प्रेयसीलाही दिलं श्रेय
–रावसाहेब दानवेंची पुन्हा घोडचूक! दानवेंना झालंय तरी काय???
वारा कोणत्याही दिशेने असला तरी ‘वेल्हेकर’ सत्याच्या बाजूनेच उभे राहतात- सुप्रिया सुळे
Comments are closed.