बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘नया है आप!’, अमित ठाकरेंवर टीका करणाऱ्या दीपाली सय्यदना मनसेनं सुनावलं

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्याविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यापासून राजकीय वर्तुळात गदारोळ सुरू आहे. अनेकांनी राज ठाकरेंच्या भूमिकेला समर्थन दर्शवलं तर महाविकास आघाडीतून (Mahavikas Aghadi) मात्र जोरदार विरोध करण्यात येत आहे.

राज्यात या मुद्द्यावरून राजकारण रंगत असताना शिवसेना नेत्या दीपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी राज ठाकरेंसह अमित ठाकरेंवर (Amit Thackeray) टीका केली. तुम्हारे कार्यकर्ताओंको ये जो धरपकड्या है. उसमे आपके अमित ठाकरे को वगळ्या है. किधर छुप्या है अमित ठाकरे बतावो सबको, असं ट्विट करत दीपाली सय्यद यांनी टीका केली होती. दीपाली सय्यद यांच्या या टीकेला मनसेकडून (MNS) प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

तुम्या मालून नही रहेग्या. नया नया पॉलिटिक्स आया है ना. राज ठाकरे साहेब घर मे बैठाके फेसबुक लाईव्ह करने वाले लीडर नही है. सौ से ज्यादा आंदोलन के केस है उनपे. जरा मालूमात किया तो बरा रहेगा. नया है आप, अशा शब्दात मनसेचे प्रवक्ते योगेश खैरे (Yogesh Khaire) यांनी दीपाली सय्यद यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

दरम्यान, राज ठाकरे कुठेही विजयी झाले नाहीत. ते आता तरी विजयी व्हावे, असा टोला देखील दीपाली सय्यद यांनी लगावला होता. दीपाली सय्यद यांनी आणखी एकदा टीका केल्याने योगेश खैरे यांनी ट्विट करत दीपाली सय्यद यांच्यावर निशाणा साधला आहे.

 

थोडक्यात बातम्या-

किम जोंग उनच्या उत्तर कोरियात कोरोनाचा विस्फोट; धक्कादायक आकडेवारी समोर

सावधान! लहान मुलांवर घोंगावतंय टोमॅटो फ्लूचं सावट, ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष नका करू

…अन् सेहवागने बीसीसीआयला फटकारलं; वाचा काय आहे नेमकं प्रकरण

किरीट सोमय्यांच्या नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

“…केवळ राजकारणासाठी वातावरण दूषित करू नये”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More