बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मोदीजी आता थाळ्या आणि टाळ्या वाजवायला सांगू नका, लोकांना कसं जगवणार ते सांगा”

पुणे |  पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज रात्री 8 वाजता पुन्हा एकदा देशवासियांशी संवाद साधणार आहेत. मागील आठवड्यात देशवासियांशी संवाद साधून जनता कर्फ्यू पाळा, असं आवाहन करत अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांसाठी टाळ्या आणि थाळ्या वाजवाव्यात, असं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं होतं. मात्र आज मोदीजी असं काही करायला सांगू नका. आपण लोकांना जगवण्यासाठी काय पावलं उचलणार आहोत किंबहुना काय उपाययोजना केल्या आहेत ते सांगा, असं मनसे नेत्या रूपाली ठोंबरे यांनी म्हटलं आहे.

रूपाली पाटील यांनी ट्वीट करत मोदींच्या आजच्या संबोधनावर टोला लगावला आहे. महाराष्ट्रात कोरोनाची दाहकता वाढते आहे. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतो आहे. यासंबंधी केंद्राने राज्याला यावर उपायायोजना करण्यासाठी किती निधी दिला हे सांगायला पाहिजे तसंच कोरोनावरची लस, हॉस्पिटल आणि औषधं यावर आज मोदींनी बोलायला हवं, असं पाटील म्हणाल्या आहेत.

मागील आठवड्यात देशाला उद्देशून केलेल्या भाषणात नरेंद्र मोदी म्हणाले होते की, “सध्या युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुसऱ्या महायुद्धावेळी देखील एवढी झळ बसली नव्हती तेवढी झळ आता जाणवते आहे. कोरोनाची लढाई ही प्रत्येक भारतीयाला लढायची आहे. त्यामुळे घाबरून जाता आपण स्वत:ची आणि कुटुंबियांची काळजी घेतली पाहिजे आणि आवश्यक कामाशिवाय जनतेने घराबाहेर पडू नये”

दरम्यान, कोरोनाचं संकट दिवसेंदिवस भीपषण होत चाललं आहे. देशात रोज कोरोनाग्रस्तांचे आकडे वाढत आहेत. तसंच आतापर्यंत 10 लोकांचा जीव देखील गेला आहे.या सगळ्या पार्श्वभूमीवर आज मोदी काय बोलणार कोणत्या घोषणा करणार, याकडे देशवासियांचं लक्ष लागलं आहे.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या शंभरीपार; पुण्यात आणखी 3 रुग्ण पॉझिटिव्ह

महाराष्ट्राला दुसरं मोठं यश; मुंबईतील 12 रुग्ण कोरोनामुक्त

महत्वाच्या बातम्या-

26 मार्चला होणारी राज्यसभेची निवडणूक आयोगाने पुढे ढकलली

पंतप्रधान मोदी आज रात्री 8 वाजता पुन्हा संबोधित करणार; काय घोषणा करणार??

दिलासादायक! गेल्या 24 तासात राजधानी दिल्लीत एकही कोरोना रुग्ण आढळला नाही

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More