Top News महाराष्ट्र मुंबई

“राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला तर पुन्हा वाशी टोलनाका फोडू”

मुंबई | 2014 च्या वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे दुपारी 12 कोर्टात हजर राहणार आहेत. दरम्यान वाशी टोलनाक्याजवळ जवळपास 2000 कार्यकर्ते वाट पाहत आहेत. यावेळी मनसे सैनिकांनी इशारा दिला आहे.

निकाल काहीही लागूदे पण जर राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला तर पुन्हा वाशी टोलनाका फोडू, असा इशारा मनसे कार्यकर्ते विनोद पाखरे यांनी सांगितलं आहे. आम्ही राज ठाकरेंसोबत न्यायालयात जाणार असल्याचं पाखरेंनी सांगितलं आहे.

राज ठाकरे कृष्णकुंजवरून निघाले असून त्यांना 12 पर्यंत कोर्टात हजर राहायचं आहे. याआधी कोर्टाने राज ठाकरेंना दोन समन्स बजवाले होते मात्र कोर्टात हजर न राहिल्याने कोर्टाने त्यांना आता आदेशा दिला आहे.

दरम्यान, राज ठाकरेंवर कितीही केस पडल्या तरी आम्ही राज ठाकरेंसोबत राहणार असल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलं. त्यामुळे वाशी टोलनाका तोडफोडीच्या प्रकरणाचा काय निकाल लागतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘सचिन तेंडुलकर भारतरत्नसाठी पात्र नाही त्याऐवजी…’; या माजी खासदाराने केली सचिनवर टीका

‘ज्यांना कोणाला पक्षात यायचं असेल त्यांना दारं खुली पण…’; राज ठाकरेंची खुली ऑफ

…म्हणून कंगणाची ट्विटरला धमकी; म्हणाली, “टिकटाॅकसारखं तुलाही बॅन करु”

‘अक्षयने लग्नाचं वचन देत मला…’; शिल्पा शेट्टीने अक्षय कुमारवर केले हे धक्कादायक आरोप

महाविकास आघाडीत कुरबुरी; शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून टोचले काॅंग्रेसचे कान

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या