आगामी निवडणुकीत मनसे कुणासोबत जाणार?; पाहा काय म्हणाले संदीप देशपांडे…

मुंबई | आगामी निवडणुकीत मनसे कोणत्या पक्षासोबत जाणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांना यासंदर्भात ‘ट्विटरकट्ट्या’वर यासंदर्भातच प्रश्न विचारण्यात आला होता. 

येत्या विधानसभा निवडणुकीत मनसे कोणत्या इतर पक्षासोबत युती करून लढेल का? त्यासाठी काही प्रयत्न चालू आहेत का?, असा प्रश्न वैष्णवी नावाच्या यूझरने विचारला होता. 

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी अत्यंत चतुराईने या प्रश्नाचं उत्तर दिलं. सगळीच गुपितं उघड करायची नसतात, असं उत्तर त्यांनी या प्रश्नावर दिलं. संदीप देशपांडे यांनी या प्रश्नाला नकारार्थी उत्तर दिलं नाही हे आणखी विशेष. 

महत्त्वाच्या बातम्या-

-माजी महिला राज्यमंत्र्याला सासरच्यांकडून जाळून मारण्याचा प्रयत्न!

-लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यांना आमदार नितेश राणेंचा पाठिंबा

आता मोदी सरकारची लाज वाटतेय; राहुल गांधींचा हल्लाबोल

-शिवसेनेच्या मदतीमुळेच जळगाव महापालिकेत भाजपच्या महापौर

-हिंदू राष्ट्र झाले तर देशाच्या चिरफाळ्या उडतील!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या