मनसेविरोधात शिवसेनेने दंड थोपटले, फेरीवाल्यांच्या बाजूने मैदानात?

मुंबई | मनसेच्या फेरीवालाविरोधी धोरणाविरोधात शिवसेनेने दंड थोपटल्याचं दिसतंय. कारण फेरीवाल्यांसाठी शिवसेनेनं रविवारी (ता.12) चक्क सभेचं आयोजन केलंय. त्यासंदर्भातील पोस्टर सोशल मीडियात व्हायरल झालेत. 

राज ठाकरेंनी फेरीवाल्यांविरोधात आंदोलन पुकारल्यानंतर काँग्रेस नेते संजय निरुपम फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ उभे ठाकले होते. आता मुंबई फेरीवाला संघटनेच्या आडून शिवसेनाही मनसेला शह देत असल्याचं दिसतंय. 

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं आमदार सुनील प्रभू यांनी फेरीवाला सेनेची स्थापना केल्याचं या पोस्टरमध्ये म्हटलंय. असं असेल तर आगामी काळात फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरुन शिवसेना-मनसेत राडा होण्याची शक्यता आहे.