बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मिर्झापूर असो किंवा महाराष्ट्र, राजकारणात प्यादीच मरतात”

मुंबई | मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणामुळे सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. यावेळी चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. याप्रकरणावरून भाजपने सरकारला सोळी की पळो करून सोडलं आहे. अशात याचप्रकरणावरून मनसेनेही ठाकरे सरकार निशाणा साधला आहे.

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओद्वारे मिर्झापूर असो किंवा महाराष्ट्र, राजकारणात प्यादीच मरतात, असा टोला संदीप देशपांडे यांनी सरकारला लगावला आहे.

संदीप देशपांडे यांनी याआधी देखील महाराष्ट्राला लागून असलेली राज्य गोवा, गुजरात कर्नाटक मध्य प्रदेश आंध्र प्रदेश इथे कोरोना वाढत नाही. कोरोनाच महाराष्ट्रावर प्रेम आहे की महाराष्ट्र सरकारच कोरोना वर प्रेम आहे? की स्वतःच अपयश झाकण्यासाठी टाळे बंदी आणि कोरोनाचा वापर होतो आहे, असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला होता.

दरम्यान,  सचिन वाझेंचं नाव या प्रकरणात समोर आल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. स्कोर्पिओ मालक मनसुख हिरेन यांचा मृत्यू आणि सचिन वाझे यांना अटक या प्रकरणाचे एकमेकांशी धागेदोरे जोडलेले आहेत. मुंबई पोलिस दलामध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. DGP हेमंत नगराळे यांच्याकडे मुंबईचं पोलिस आयुक्तपद सोपवण्यात आलं आहे. तर परमबीर सिंग यांची बदली होमगार्ड विभागात करण्यात आली आहे. सचिन वाझे यांच्यावर आरोप करणाऱ्या विरोधी पक्षाने परमबीर सिंग यांचीही बदली करावी, अशी मागणी केली होती.

 

 

थोडक्यात बातम्या- 

राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत कमालीची वाढ; गेल्या 24 तासांत ‘इतक्या’ हजार रूग्णांची नोंद

‘शार्ली हेब्दो’चं आणखी एक वादग्रस्त व्यंगचित्र, वाचा काय आहे प्रकरण

देवेंद्र फडणवीसांसह भाजप नेत्यांनी घेतली अमित शहांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

‘तुम्ही प्रचार करू नका’; ‘या’ काँग्रेस नेत्याचं शरद पवारांना पत्र

विद्यार्थ्यांच्या परिक्षेसंदर्भात पुणे विद्यापीठाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More