बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आम्हाला संपलेला पक्ष म्हणून हिणवलं, त्यांच्याकडे आज ना पक्ष आहे ना चिन्ह”

मुंबई | शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वेगळा गट स्थापन केला. शिंदे गटाने आमचा गट म्हणजेच खरी शिवसेना असा दावा केला. तसेच आता त्यांनी शिवसेनेचे अधिकृत निवडणूक चिन्ह धनुष्यबाण यावर देखील दावा केला आहे. त्यांच्या गटाला धनुष्यबाण चिन्ह मिळावं याकरीता ते न्यायालयात देखील जाणार आहेत.

शिवसेनेच्या सद्यस्थितीवर भाजप नेते रोज टीका करत आहेत. आता त्यात मनसे पक्षाने देखील उडी घेतली आहे. आणि शिवसेनेच्या जखमेवर मीठ चोळलं आहे. मनसेच्या अधिकृत फेसबूक पेजवरून एक पोस्ट टाकण्यात आली आहे. त्यात त्यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.शिल्लकसेना अशी पोस्ट मनसे वृत्तांत या पानावरुन करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाला संपलेला पक्ष म्हणून हिणवणाऱ्यांकडे आता ना पक्ष आहे ना चिन्ह, असं म्हणत टोला लगावला आहे.

मनसेच्या अधिकृत पानावरुन टाकलेल्या पोस्टमध्ये उद्धव आणि आदित्य ठाकरेंचा एक फोटो टाकण्यात आला आहे. अणि आदित्य ठाकरेंच्या जून्या विधानांचा संदर्भ देत नियतीचा खेळ, असं म्हटलं आहे. मनसेनेला संपलेला पक्ष म्हणून हिणवणारे आदित्य ठाकरे आता आज पक्ष नसलेला माणूस झाले आहेत. आता चिन्ह देखील गमावण्याची वेळ आली असल्याने ते आता महाराष्ट्राच्या राजकारणातील चेष्टेचा विषय बनले आहेत. म्हणून एखाद्याच्या वाईट काळात कधीच कोणाला हिणवू नये, असं म्हटलंय.

येता 11 जुलैचा निर्णय शिवसेनेच्या भवितव्याचा निर्णय ठरणार आहे. हाच निर्णय देशाच्या लोकशाहीचं भविष्य ठरवेल असं उद्धव ठाकरे म्हणालेत.

थोडक्यात बातम्या –

अमरनाथ ढगफुटीतील मृतांचा आकडा वाढला, महत्त्वाची माहिती समोर

“महाराष्ट्राचे 3 तुकडे करण्याचा दिल्लीचा विचार, तुम्ही भाजपच्या हो ला हो केलं तर मुंबई हातची जाईलच”

काँग्रेस नेत्याने अग्निपथ योजनेशी जोडला शिंजो आबेंच्या मृत्यूशी संबंध, म्हणाले…

शिंदे-फडणवीस अमित शहांच्या भेटीला, तिघांमधील बैठक रात्री 2 वाजता संपली

अमरनाथमध्ये ढगफुटी; आतापर्यंत 15 भाविकांचा मृत्यू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More